Ranveer Singh Dance Video  Instagram
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh Dance Video: रणवीरने ९३ वर्षांच्या आजोबांसोबत धरला जबरदस्त ठेका, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची भन्नाट कमेंट

Chetan Bodke

Ranveer Singh Promotional Dance Video:

सध्या बॉक्स ऑफिसवर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. अवघ्या ५ दिवसातच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमावला आहे. पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६३ कोटींचा गल्ला जमावला आहे. सध्या रणवीर- आलिया प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. चित्रपटातील रॉकी- रानीची जोडी प्रेक्षकांचे खुपच मनोरंजन करत आहे. सध्या दोघंही प्रमोशननिमित्त रॉकी- राणीचे टी-शर्ट घालताना दिसतात तर कधी चित्रपटातील गाण्यावर डान्सही करतांना दिसतात. नुकतंच रणवीरने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अशातच रणवीरने त्याच्या आजोबांसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ९३ वर्षांच्या आजोबांसोबत पहिल्यांदाच रणवीरने फोटो शेअर करत चाहत्यांसोबत ओळख करून दिली आहे. रणवीरच्या आजोबांना पाहिल्यानंतर रणवीर सिंगला इतकी एनर्जी कुठून मिळते ? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं आहे.

शेअर केलेल्या व्हिडीओत रणवीरने त्याच्या आजोबांसोबत ‘टीम रॉकी, व्हॉट झुमका’ अशा नावाचं टी-शर्ट घातले आहे. या व्हिडिओत तो आजोबांसोबत ‘झुमका गिरा रे’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आजोबा 'टिक्की छोडो, तकीला लाओ' असं म्हणत आहेत.

रणवीरचा आणि त्याच्या आजोबांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सेलिब्रिटींसह अनेक युजर्सने व्हिडीओवर कमेंट केली आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी रणवीरच्या व्हिडीओवर कमेंट केल्याअसून आजोबांच्या एनर्जीचं कौतुक केलं आहे.

करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपट गेल्या २८ जुलैला प्रदर्शित झाला असून चित्रपटात प्रमुख भूमिकेत रणवीर सिंह- आलिया भट्ट सोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी, चुर्णी गांगुली आणि क्षिती जोग आहेत. १६० कोटींच्या बजेटमध्ये निर्मित झालेला हा चित्रपट लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करेल अशी आशा निर्माते आणि चाहत्यांना आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT