Shahrukh Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan-Rani Mukerji : किंग खानच्या चित्रपटात राणी मुखर्जीची दमदार एन्ट्री, कोणती भूमिका साकारणार?

King Movie Cast: शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटासंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात आता बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी झळकणार आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडचा किंग खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आजवर त्याने अनेक हिट चित्रपट केले आहे. त्याच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. सध्या तो त्याचा आगामी चित्रपट 'किंग' च्या (King ) शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची मोठी अपडेट समोर आली आहे. 'किंग' चित्रपटात आता बॉलिवूडच्या सुपरस्टार अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात राणी मुखर्जी झळकणार आहे.

आता पुन्हा एकदा खूप वर्षांनी शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) ही जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. या बातमीने चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. चाहते यांना एकत्र पाहण्यासाठी खूपच आतुर आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, राणी मुखर्जी चित्रपटात सुहानाच्या आईची भूमिका साकारणार आहे. राणी मुखर्जीचा 'किंग' चित्रपटात कॅमिओ असणार आहे. मात्र याबाबत निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही आहे.

'किंग' स्टारकास्ट

शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. यात सुहाना खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, अभय वर्मा, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि अर्शद वारसी हे कलाकार धुमाकूळ घालणार आहेत. 'किंग' हा सिध्दार्थ आनंद दिग्दर्शित एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. ज्यात शाहरुख खान मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

राणी मुखर्जी-शाहरुख खान

राणी मुखर्जी आणि शाहरुख खान प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या जोडीने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'कभी अलविदा ना कहना' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना कायमच भुरळ घालतो. शाहरुख खानचे चाहते किंग चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, किंग' चित्रपट 2026 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड; तीन आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी

Maharashtra News Live Update: वसई-विरारमधील तलावांमध्ये पडून होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमुळे आंदोलन

Dry Day: पुण्यासह संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीत दारू विक्रीबंदी; किती तारखेपर्यंत बंद असणार दारूची दुकानं?

अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम, तब्बल १२ जणांचे पुनर्वसन

Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, नवीन व्हिडीओ आला समोर, मुलाचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT