Randeep Hooda Saam TV
मनोरंजन बातम्या

Randeep Hooda: 'आज मी बाबा झालो...'; रणदीप हुड्डाच्या घरी गोंडस मुलीचे आगमन, सोशल मीडियावर केली खास पोस्ट

Randeep Hooda: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन लैशराम यांनी १० मार्च रोजी त्यांच्या मुलीचे स्वागत केले आहे. सोशल मीडियावर खास पोस्टमध्ये रणदीप हुड्डाने त्याच्या मुलीची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली.

Shruti Vilas Kadam

Randeep Hooda: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी, अभिनेत्री लिन लैशराम यांनी त्यांच्या मुलीचे स्वागत केले आहे. काल, १० मार्च २०२६ रोजी हे कपल एका मुलीचे आई-बाबा बनले. रणदीप हुड्डाने स्वतः सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली. खास क्षण शेअर करताना त्याने त्याची मुली आणि वडिलांसोबतचा फोटो पोस्ट केला.

त्याची पत्नी लिन लैशराम हिने एका मुलीला जन्म दिला आहे. या बातमीने त्यांच्या कुटुंबात आणि चाहत्यांमध्ये आनंद साजरा करण्यात येत आहे. रणदीप हुड्डा यांनी स्वतः सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली. अभिनेत्याने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली, यामध्ये मुलीच्या आगमनाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजेच ९ मार्च रोजी त्यांनी मॅटरनिटी फोटोशूटचे काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

दोन खास फोटो शेअर केले

रणदीप हुड्डाने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचे वडील रणबीर हुड्डा यांनी त्यांच्या नातीला प्रेमाने हातात घेतलेले दिसतं आहे. हा फोटो आणखी खास होता कारण काल रणदीपच्या वडिलांचा वाढदिवस आहे. फोटोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. फोटोवर १० मार्च २०२६ ही तारिख लिहिलेली आहे.

रणदीप आणि लिन यांनी २९ नोव्हेंबर २०२३ रोजी मणिपुरी मेईतेई पद्धतीनुसार लग्न केले. या कपलच्या लग्नात जवळच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या उपस्थितीत होते. २०११ मध्ये नसीरुद्दीन शाह यांच्या थिएटरमध्ये त्यांची पहिली भेट झाली, जिथे त्यांची मैत्री झाली. हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि अखेर त्यांनी लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: अबब! 12 मजली इमारती इतका उंच अन् 480 मीटर लांब; बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर उभारला भव्य पूल, काय आहे पुलाची खासियत? वाचा

Maharashtra News Live Update: ठाण्यातील पुर्णेकर हत्या प्रकरणावरून आता आगरी समाज आक्रमक

Copper Utensils : धनतेरसपूर्वी तांबे-पितळाची भांडी घेताय? शुद्धता ओळखण्यासाठी या ट्रिक येतील कामी

Rice Water Benefits for Skin : चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावल्याने होतात ‘हे’ 5 चमत्कारिक फायदे; काळे डाग अन् सुरकुत्या होतील गायब

Avocado Benefits: हृदयापासून त्वचेपर्यंत फायदेशीर 'हे' एक फळ; जाणून घ्या ७ फायदे आणि कसे खावे

SCROLL FOR NEXT