Randeep Hooda Distributed Food Packets Saam TV
मनोरंजन बातम्या

Randeep Hooda Extends Helping Hand : बोट उचलली, बॉक्स दिले.. रणदीप हुडाने हरयाणातील पुरग्रस्त बांधवांच्या घरी जाऊन केली मदत

Randeep Hooda Helps Flood Victims : रणदीप हूडा नेहमीच गरजांना मदत करण्यासाठी पुढे असतो.

Pooja Dange

Randeep Hooda distributes ration to flood-hit people : रणदीप हूडा त्याच्या उत्तम चित्रपटांसाठी आणि अभिनयासाठी ओळखला जातो. सध्या तो स्वतंत्रवीर सावरकर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो वीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. स्वतंत्रवीर सावरकर या पात्रासाठी रणदीपने खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटाशिवाय रणदीपही आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे.

रणदीप हूडा नेहमीच गरजांना मदत करण्यासाठी पुढे असतो. यावेळी देखील अभिनेत्याने तेच केले आहे. अलीकडेच रणदीपने हरियाणातील पूरग्रस्तांना मदत केली आहे. (Latest Entertainment News)

2018 मध्ये रणदीप हूडाने त्याचा वाढदिवस त्याच्या मित्र आणि कुटुंबीयांना पार्टी न देता साजरा केला. त्याऐवजी, तो पूरग्रस्त केरळला गेला आणि खालसा एडच्या मदतकार्यात सहभागी झाला. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात त्यांनी पिण्याचे पाणीही उपलब्ध करून दिले आहे. आता पुन्हा एकदा अभिनेत्याने तो गोल्डन हार्टेड माणूस असल्याचे सिद्ध केले आहे.

भारतात पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्याने अनेक गावे, शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने सखल भागाला पुराचा फटका बसला आहे.

मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून लोकांच्या खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. तशीच अवस्था हरियाणाची आहे. अशा परिस्थितीत रणदीप हूडा यांनी लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आणि हरियाणातील पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप केले आहे.

खालसा एडने अभिनेत्याच्या उदात्त कार्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, या फोटो आणि व्हिडिओमध्ये रणदीपने भगवा फेटा घातला असून गरजूंना स्वयंपाकाचे तेल वाटप करताना दिसत आहे. अभिनेत्यासोबत त्याची गर्लफ्रेंड लिन लैश्राम देखील त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याची आणि पुरग्रस्तांची मदत करत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी पाणी दोघेही साचलेल्या भागातून फिरताना दिसत आहेत.

रणदीपच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणदीपने नुकतेच 'स्वतंत्रवीर सावरकर' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनपट आहे. उत्कर्ष नैथानी आणि रणदीप हूडा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

SCROLL FOR NEXT