Ranbeer Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor: ‘आपण जगाला वाचवत नाहीत...’ बॉयकॉट ट्रेंडबद्दल रणबीर जरा स्पष्टच बोलला

बॉलिवूड चित्रपटांना बॉयकॉट करणं ‘निराधार’ असल्याचं मत रणबीर कपूरने व्यक्त केलं आहे.

Chetan Bodke

Ranbir Kapoor On Calls To Boycott Bollywood: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याचा आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘झुठी मैं मकर’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. बॉलिवूडमध्ये सध्या अनेक चित्रपटांवर बॉयकॉट टाकण्यात येत आहे. बॉलिवूड चित्रपटांना बॉयकॉट करणं ‘निराधार’ असल्याचं मत रणबीर कपूरने व्यक्त केलं आहे. रणबीरचा ‘झुठी मैं मकर’ हा आगामी चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

‘झुठी मैं मकर’च्या प्रमोशनमध्ये रणबीर सध्या व्यस्त आहे. रविवारी त्याच्या नवीन चित्रपटाचे प्रमोशन करताना, रणबीरने क्रिकेटर सौरव गांगुलीच्या बायोपिकची ऑफर दिल्याचे वृत्तही फेटाळून लावले. त्या दरम्यान त्याने स्पष्ट केले की, मी सौरव गांगुलीच्या भूमिकेत दिसणार गायक किशोर कुमारांच्या भूमिकेत दिसणार आहे.

माध्यमांसोबत बोलताना रणबीर बोलतो, “‘बॉलिवुडला बॉयकॉट करा’ हे वाक्य मला खरोखरच निराधार वाटते. महामारीनंतर अनेक नकारात्मक गोष्टी बाहेर येत आहेत. प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या उद्देशाने चित्रपट बनवले जातात. आपण जगाला वाचवत नाही आहोत. प्रेक्षक आपल्या काळजाचा ठोका विसरण्यासाठी थिएटरमध्ये येतात. ते मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहायला येतात आणि आपले मनोरंजन करुन घेतात. मी कधीच चित्रपट बहिष्काराचा विचार करत नाही.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड, आधी अत्याचार मग महिलांचा गर्भपात करायचा

Weight Loss Drink Recipe : रिकाम्या पोटी प्या एक ग्लास 'हे' ड्रिंक, १५ दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल फिट

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

Latur Police: लाच घेताना पोलिस निरीक्षकाला अटक, ACB ची मोठी कारवाई; पोलिस दलात खळबळ

Crime: वर्षभरापूर्वी लग्न, नवऱ्याचे अनैतिक संबंध; मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या बायकोची आत्महत्या, संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT