Manjot Singh News Instagram/ @royal_manjjot_singhh
मनोरंजन बातम्या

Manjot Singh News: ‘ॲनिमल’ फेम अभिनेत्याने वाचवले तरुणीचे प्राण; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांकडून तोंडभरून कौतुक

Manjot Singh News: सध्या सोशल एक व्हिडीओ व्हायरल होतोय, या व्हायरल व्हिडीओमध्ये तो एका मुलीचे प्राण वाचवताना दिसत आहे.

Chetan Bodke

Manjot Singh News

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ चित्रपटाने फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर जगभरामध्ये दमदार कमाई केली आहे. चित्रपटाप्रमाणेच चित्रपटातील कलाकारही सध्या चर्चेत आहे. चित्रपटामध्ये रणबीरच्या सहकलाकाराची भूमिका साकारणाऱ्या मनजोत सिंहची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. त्याच्या एका कृत्याने सर्वांचेच मन जिंकले आहे. सध्या सोशल एक व्हिडीओ व्हायरल होतोय, या व्हायरल व्हिडीओमध्ये तो एका मुलीचे प्राण वाचवताना दिसत आहे. (Bollywood Film)

त्या व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेता आत्महत्या करणाऱ्या एका मुलीला वाचवताना दिसत आहे. हा व्हिडीओ चार वर्षांपूर्वीचा म्हणजेच २०१९चा आहे. एका कॉलेजच्या इमारतीवरून ती मुलगी उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. तितक्यातच त्याने तिचे जीव वाचवले. व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर त्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. (Bollywood Actor)

अभिनेत्याने हा व्हिडीओ स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओला मनजोतने , “ही घटना २०१९ मध्ये घडली होती. एक मुलगी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती, देवाच्या कृपेने मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी मी तिचा जीव वाचवू शकलो. सर्वांनाच आपल्या लाईफमध्ये अनेक प्रॉब्लेम्स असतात. त्यांचा सामना करुन जगणं हे धैर्याचं काम आहे.” (Social Media)

मनजोतच हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर त्याच्या कामाचे सर्वचजण कौतुक करताना दिसत आहेत. दरम्यान, मनजोत नुकताच ‘ॲनिमल’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याने चित्रपटामध्ये रणबीरच्या भावाची भूमिका साकारली होती. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shengdana Chutney Recipe: भाजलेल्या शेंगदाण्याची तिखट चटणी कशी बनवायची? अत्यंत सोपी आहे रेसिपी

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

SCROLL FOR NEXT