Rana Daggubati Wife Miheeka Bajaj Pregnancy Rumors  Instagram
मनोरंजन बातम्या

Rana Daggubati Wife Miheeka Bajaj Pregnancy Rumors: बाहुबलीतील भल्लालदेव होणार बाबा?, स्माईल देत दिली हिंट...

Rana Daggubati Reacts To Wife Miheeka Bajaj Pregnancy Rumors: साऊथ सुपरस्टार राणा डग्गुबाती लवकरच बाबा होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

Chetan Bodke

Rana Daggubati And Wife Miheeka Bajaj: दाक्षिणात्य अभिनेता राणा डग्गुबाती ‘बाहुबली’ चित्रपटातील भल्लालदेव या भूमिकेपासून सोशल मीडियावर बराच चर्चेत आला. राणा डग्गुबाती आणि मिहिका बजाज यांनी ८ ऑगस्ट २०२० मध्ये हैद्राबाद येथे लग्नगाठ बांधली होती. राणा आणि त्याची पत्नी लग्नानंतर जास्त सोशल मीडियावर सक्रिय दिसत नाहीत. पण अनेक मीडिया रिपोर्टसने दिलेल्या माहितीनुसार, तो लवकरच बाबा होणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. त्याने अद्याप ही माहिती अधिकृत जाहीर केलेली नाही.

नुकताच राणाने ‘इंडिया टुडे’च्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी राणाला तू वडील होणार आहेस का? असं विचारलं असता त्याने काहीही उत्तर न देता एक स्मित हास्य दिलं होतं. आता यावरुन त्याची एक स्माईल सर्वकाही सांगून जाते, तो लवकरच बाबा बनणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा सोशल मीडियावर होत आहे. अभिनेत्याने किंवा त्याच्या पत्नीने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. (Entertainment News)

अलीकडेच इंडिया टुडेने राणा डग्गुबातीला त्यांच्या एका कार्यक्रमात प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याने त्या प्रश्नावर मौन बाळगले. तेव्हापासून अनेक चाहत्यांनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव करत त्याचे अभिनंदन केले. माहितीसाठी सांगतो, राणाची पत्नी मिहिका एक यशस्वी इव्हेंट मॅनेजर आहे. त्यांचा 'ड्यू ड्रॉप डिझाईन स्टुडिओ' नावाचा एक स्टुडिओ देखील आहे. (Tollywood)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक लुटण्याचा प्रयत्न

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जानेवारीचे ₹१५०० आले, फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार? वाचा सविस्तर

Calories burned during sleep: घामाचा एकही थेंब न गाळता कसं बर्न कराल फॅट? फक्त झोपेच्या सवयींमध्ये करा हे बदल

Love jihad law : राज्यात लव्ह जिहादचा कायदा येणार, फडणवीस सरकारकडून हालचालींना वेग, पहिला ड्राफ्ट तयार

Kalyan Dombivli : केडीएमसीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत;महापौर, उपमहापौर बिनविरोध, तरीही महासभा का नाही? कुणाचा दबाव?

SCROLL FOR NEXT