Arun Govil Injured On Set saam tv
मनोरंजन बातम्या

Arun Govil: 'रामायण' फेम अभिनेत्याचा शूटिंगदरम्यान अपघात, निर्मात्याने सांगितलं नेमकं काय घडलं?

Arun Govil News: प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल यांना शुटिंग दरम्यान दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.

Chetan Bodke

Arun Govil Injured On Set

‘रामायण’ मालिकेमध्ये भगवान रामाचे पात्र साकारणारे प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल यांना शुटिंग दरम्यान दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. अरुण गोविल यांना ‘नोटिस’ चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान दुखापत झाली आहे. त्यांना दुखापत झाली होती, तरीही आपली शूटिंग पूर्ण केली. दरम्यान, अरुण यांना शुटिंगच्या शेवटच्या शेड्युलमध्ये दुखापत झाली. (Actor)

अरुण गोविल यांच्या चित्रपटाची शुटिंग चित्रकूट येथील एका सेटवर सुरु होती. अरुण यांच्यासोबत चित्रपटामध्ये, दीपिका चिखलिया सुद्धा दिसणार आहे. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेमध्ये अरुण यांनी प्रभु श्री रामाचे तर दीपिका यांनी सीतेचे पात्र साकारले होते. या मालिकेमुळे त्या दोघांनाही चांगलीच लोकप्रियता मिळाली. ‘रामायण’ मालिकेनंतर ‘नोटिस’ चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Social Media)

अरुण गोविल यांचे सर्व सीन्स शूट झाले आहेत. अद्याप चित्रपटासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. एका महत्वाच्या सीनचं चित्रीकरण करत असताना ते जखमी झाल्याचे वृत्त अभिनेते आणि निर्माते आदित्य प्रताप सूर्यवंशी यांनी दिले. नारायण गुप्ता यांच्या भूमिकेत असलेले अरुण गोविल यांना एक अधिकारी ताब्यात घेण्यासाठी येतो. या सीनमध्ये जीप ड्रायव्हरने रिव्हर्स घेताना अरुण गोविल यांच्या कोपराला जोरात लागले. अरुण गोविल सेटवर जखमी झाल्यानंतर त्यांच्या मदतीला सर्वच जण धावून आले होते. मात्र दुखापत झाली तरीही त्यांनी आपला सीन पूर्ण केला. (Serial)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘नाशिकची स्पेशल मिसळ थाळी’; चव अशी की पोट भरून खातील! 

Marathi LanguageRule: मुजोरी कराल तर आयुष्यभरासाठी लायसन्स रद्द करू, प्रताप सरनाईकांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना इशारा

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना बसला मोठा धक्का! एकाच झटक्यात भाव गगनाला भिडले, काय आहेत नवे दर?

Cardamom Benefits : सलग १५ दिवस वेलची खाल्ल्याने शरीरात होतील 'हे' ६ महत्त्वाचे बदल

SCROLL FOR NEXT