Ramayana Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ramayana: जगातील सर्वात भव्य महाकाव्यांचा आरंभ 'रामायण'; अभिनेता रणबीर कपूरची मोठी भूमिका

Ramayana: The Introduction Out : जगातील सर्वात मोठ्या सिने-प्रकल्पांपैकी एक ठरणाऱ्या नमित मल्होत्रा यांची ‘रामायण’ या दोन भागांच्या थरारक live-action सिनेमॅटिक युनिव्हर्सचा प्रास्ताविक भाग ‘रामायण: द इंट्रोडक्शन’ आज जागतिक स्तरावर सादर करण्यात आला

Manasvi Choudhary

सुमारे २.५ अब्ज लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली, ५,००० वर्षांपूर्वीची कथा आता नव्या रूपात साकारली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या सिने-प्रकल्पांपैकी एक ठरणाऱ्या नमित मल्होत्रा यांची ‘रामायण’ या दोन भागांच्या थरारक live-action सिनेमॅटिक युनिव्हर्सचा प्रास्ताविक भाग ‘रामायण: द इंट्रोडक्शन’ आज जागतिक स्तरावर सादर करण्यात आला.

जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपटात्मक उपक्रमाच्या निर्मात्यांनी ‘रामायण: द इंट्रोडक्शन’ या जागतिक लॉन्चसह रामायणाच्या भव्य विश्वाचा अनावरण केला ज्यामध्ये पौराणिक काळातील दोन सर्वात प्रतिष्ठित शक्तींमधील शाश्वत युद्धाचा मंच तयार करण्यात आला आहे: राम वि. रावण. या लॉन्चचा प्रसार संपूर्ण जगभर झाला भारतातील नऊ शहरांमध्ये चाहत्यांसाठी खास स्क्रीनिंग्स आणि न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये नेत्रदीपक बिलबोर्ड ताबा घेण्यात आला.

दृष्टीकोन असलेले चित्रपट निर्माते आणि निर्माता नमित मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहनिर्माते म्हणून यश यांच्या सहभागाने, 'रामायण' या चित्रपटात ऑस्कर-विजेते तंत्रज्ञ, हॉलीवूडमधील आघाडीचे निर्माते आणि भारतातील मोठमोठ्या कलाकारांचा समावेश आहे हे सर्व मिळून भारतीय संस्कृतीत रुजलेली ही महान गाथा एका आधुनिक सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या स्वरूपात जगासाठी पुन्हा साकारत आहेत.

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या कल्पक दिग्दर्शनाखाली, नमित मल्होत्रा यांच्या प्राईम फोकस स्टुडिओज व आठ वेळा ऑस्कर विजेते DNEG VFX स्टुडिओ, तसेच यश यांच्या Monster Mind Creations यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात येणाऱ्या या भव्य चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये आणि दसरा भाग दिवाळी २०२७मध्ये IMAX वर प्रदर्शित होणार आहे.

या भव्य प्रकल्पाच्या घोषणेनंतर भारतातील ९ प्रमुख शहरांमध्ये चाहत्यांसाठी खास स्क्रीनिंग्सचे आयोजन करण्यात आले, तर न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर भव्य बिलबोर्ड्सद्वारे जागतिक स्तरावर या प्रकल्पाची झलक सादर करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT