'रामायण' हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०२६ ला रिलीज
'रामायण' ८०० कोटींची कमाई
रणबीर, यशने गाजवले बॉक्स ऑफिस
नितेश तिवारी यांचा 'रामायण: राईज ऑफ अ लेजेंड' (Ramayana: Rise of a Legend) चित्रपटाची यशस्वी घोडदौड पाहायला मिळत आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांतच या चित्रपटाने जगभरात ८०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.या चित्रपटात रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांसारख्या लोकप्रिय कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. 'रामायण: राइज ऑफ अ लेजेंड' हा वाल्मिकी रामायणावर आधारित चित्रपट आहे. 'रामायण' हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'रामायण' चित्रपटाने सहाव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी भारतात ९४.१० कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. भारतातील एकूण ग्रॉस कमाई ५२६.५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तर परदेशातील कमाईसह चित्रपटाची जागतिक एकूण कमाई ८२३.५० कोटी रुपयांवर गेली आहे. या चित्रपटाने भारतात ४०० कोटी रुपयांच्या निव्वळ कमाईचा टप्पाही पार केला आहे.यात हिंदी आवृत्तीचा वाटा सर्वाधिक असून, त्यातून ७६.०० कोटी रुपयांची कमाई झाली. कन्नड आवृत्तीतून ७.७५ कोटी, तर तेलुगू आवृत्तीतून ४.०० कोटी रुपयांची भर पडली. तमिळ आणि मल्याळम आवृत्त्यांनी अनुक्रमे ३.६० कोटी आणि २.७५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.
परदेशातील बाजारपेठेतून मंगळवारी ३५.०० कोटी रुपयांची कमाई झाली, ज्यामुळे चित्रपटाची एकूण आंतरराष्ट्रीय कमाई ग्रॉस २९७.०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. चित्रपटाच्या देशांतर्गत बॉक्स ऑफिस कामगिरीमध्ये हिंदी आवृत्तीचे वर्चस्व कायम आहे. येणाऱ्या वीकेंडला चित्रपट किती कोटींचा गल्ला जमावतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
'रामायण' चित्रपट दोन भागांमध्ये सादर करण्यात येणार आहे. हा चित्रपट हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम अशा विविध भाषांमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटात सनी देओल, रवी दुबे, लारा दत्ता, अरुण गोविल, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग आणि विवेक ओबेरॉय हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.