RAMAYANA TRAILER POSTPONED: NAMIT MALHOTRA CONFIRMS GLOBAL RELEASE STRATEGY WITH SONY PICTURES Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ramayana : रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर रिलिज होणार इतक्यात..., २४ तास आधी निर्मात्याचा मोठा निर्णय; कारण काय?

Ramayana Trailer Postponed Date Update News : रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. निर्माते नमित मल्होत्रा यांनी जागतिक स्तरावर एकाच वेळी ट्रेलर रिलीज करण्याचा निर्णय जाहीर केला.

Alisha Khedekar

  • 'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर नियोजित तारखेला प्रदर्शित होणार नसून तो पुढे ढकलण्यात आला आहे

  • निर्माते नमित मल्होत्रा यांनी जागतिक स्तरावर एकाच वेळी ट्रेलर रिलीज करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले

  • चित्रपट सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटच्या भागीदारीत जगभर प्रदर्शित केला जाणार

  • ट्रेलरच्या नव्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही

रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाच्या ट्रेलरबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आज होणारा 'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर पुढे ढकलण्यात आला आहे. निर्माते नमित मल्होत्रा यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. दरम्यान आता प्रेक्षकांचे लक्ष आता रामायणाच्या ट्रेलर लाँचकडे लागले आहे.

रामायणा चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी शेअर केलेल्या सोशल मीडियावर पोस्टमध्ये स्पष्ट केले की, ट्रेलर लाँच पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र कोणत्याही तांत्रिक अडचणीमुळे किंवा चित्रपटाच्या निर्मितीतील समस्येमुळे ट्रेलर लाँच पुढे ढकलण्यात आलेला नाही. उलट, ‘रामायण’चे जागतिक स्तरावर भव्य स्वरूपात प्रदर्शित करण्याचा रणनीतीचा हा एक भाग आहे. त्यांनी सांगितले की, हा चित्रपट आता सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटच्या भागीदारीत जगभर प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे ट्रेलरही जागतिक स्तरावर एकाच वेळी रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नव्या ट्रेलर रिलीजची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमित मल्होत्रा यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि रामायणासारख्या महान पौराणिक कथेला जागतिक प्रेक्षकांसमोर मोठ्या हॉलीवूड चित्रपटाप्रमाणे सादर करण्याचे त्यांचे स्वप्न असल्याचे त्यांनी नमूद केले. चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभारही मानले.

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारत असलेला ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये जगभरातील, विशेषतः IMAX चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. आता चाहत्यांचे लक्ष ट्रेलरच्या नव्या प्रदर्शनाच्या तारखेकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरे मेट्रो स्टेशनजवळ बसला भीषण आग

Bank Job: सरकारी बँकेत मिळवा नोकरी! 1100 पदांसाठी भरती, महिन्याला कमवा 93,000 रुपये

Healthcare Tips : पिरियड्समध्ये थकवा आणि पोटदुखी वाढतेय? या 7 चुका तर करत नाही ना?

Vidyanand bapat Protection : विद्यानंद बापट यांच्या आई-वडिलांनाही २४ तास पोलीस संरक्षण

Wisdom Teeth: बुद्धीशी अक्लकदाढचा संबंध काय, प्रत्येकाला का येत नाही अक्कलदाढ? जाणून घ्या भन्नाट कारण

SCROLL FOR NEXT