Ramayan Jai Jai Ram Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ‘रामायण’ चित्रपटातील ‘जय जय राम’ गाणं रिलीज झालं. रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

Shruti Vilas Kadam

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांना खास सरप्राईज दिलं आहे. तब्बल 4000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार होत असलेल्या या मेगा बजेट चित्रपटातील पहिलं अधिकृत गाणं ‘जय जय राम’ रिलीज करण्यात आलं आहे. गाण्यासोबतच प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या भूमिकेतील रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांचं नवं पोस्टरही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पोस्टरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

ए. आर. रहमान यांचं संगीत, अरिजीत-श्रेयाचा आवाज

‘रामायण’ या भव्य चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी करत आहेत. चित्रपटातील ‘जय जय राम’ या गाण्याला संगीत क्षेत्रातील दिग्गज ए. आर. रहमान यांनी संगीत दिलं आहे. तर प्रसिद्ध लेखक डॉ. कुमार विश्वास यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. अरिजीत सिंह आणि श्रेया घोषाल या लोकप्रिय गायकांनी आपल्या मधुर आवाजात हे गाणं गायलं आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावरून गाणं रिलीज झाल्याची माहिती दिली. गणेश चतुर्थीच्या दिवशी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने चाहत्यांसाठी ही खास पर्वणी ठरली आहे.

रणबीर-साई पल्लवीची जोडी चर्चेत

‘रामायण’मध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारत आहे. दोघांचा लूक समोर आल्यानंतरच या जोडीबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता ‘जय जय राम’ गाण्यातील त्यांची झलक आणि नव्या पोस्टरमुळे ही उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटात मोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत, तर अरुण गोविल राजा दशरथ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. यश रावणाची भूमिका साकारत असून, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय रकुल प्रीत सिंह शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

दोन भागांत प्रदर्शित होणार ‘रामायण’

‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिला भाग 6 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. तर दुसरा भाग ऑक्टोबर 2027 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी ए. आर. रहमान आणि ऑस्कर विजेते हंस झिमर यांनी सांभाळली आहे. त्यामुळे ‘जय जय राम’नंतर चित्रपटातील इतर गाण्यांचीही प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विहिरीत पाणी नाही, चक्क पेट्रोल! सांगलीत खळबळ

राष्ट्रवादीकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार जाहीर; सुनेत्रा पवारांनी सतीश चव्हाणांना पुन्हा दिली संधी

गोकुळ निवडणुकीवरून राजकारण रंगलं, जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच

ज्ञानेश कुमारांना मोठा धक्का, 20 वर्षे जुन्या प्रकरणात गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

आर्यवीर सेहवागकडे संघाची धुरा; DDCAने पहिल्यांदा सोपवली कर्णधारपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT