Ramayana Box Office Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ramayana Box Office: बॉक्स ऑफिसवर 'रामायण'चा महाधमाका; १,२२८ कोटींची बंपर कमाई, 'या' सुपरहिट चित्रपटांना टाकले मागे!

Ramayana Box Office: रणबीर कपूर आणि यश यांच्या रामायण चित्रपटाने दहा दिवसांत जगभरात १,२२८ कोटींची कमाई केली. KGF 2, जवान आणि पठाणला मागे टाकत चित्रपटाने नवा विक्रम केला आहे.

Shruti Vilas Kadam

Ramayana Box Office: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'रामायण: राईज ऑफ अ लेजेंड' (Ramayana: Rise of a Legend) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवणाऱ्या या चित्रपटाने आता जागतिक बॉक्स ऑफिसवर मोठा रेकॉर्ड केला आहे. अवघ्या दहा दिवसांत चित्रपटाने जगभरात १,२२८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, या कमाईसह चित्रपटाने 'KGF: Chapter 2', 'जवान' आणि 'पठाण' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांना मागे टाकले आहे.

दहाव्या दिवशी कमाईत मोठी वाढ

'रामायण' चित्रपटाने दुसऱ्या शनिवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या दिवशी चित्रपटाने भारतात ७२.९० कोटी रुपयांचे कलेक्शन केले. विशेष म्हणजे, आदल्या दिवसाच्या तुलनेत चित्रपटाच्या कमाईत तब्बल ५१.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे भारतातील चित्रपटाचे एकूण ग्रॉस कलेक्शन ८१९.५० कोटी रुपये झाले आहे. परदेशातील ४०८.५० कोटी रुपयांच्या कमाईसह चित्रपटाचे जगभरातील ग्रॉस कलेक्शन १,२२८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

हिंदी व्हर्जनने केली सर्वाधिक कमाई

या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांकडून सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. दहाव्या दिवशी हिंदी व्हर्जनने १८,५५७ शोजमधून ५३.७५ कोटी रुपयांची कमाई केली. तर कन्नड व्हर्जनने ८९३ शोजमधून ५.४० कोटी रुपये कमावले. मल्याळम आणि तमिळ व्हर्जनने ४.७५ कोटी रुपयांची कमाई केली. तर तेलुगू व्हर्जनने ४.२५ कोटी रुपयांचे योगदान दिले. सर्व भाषांमधील कमाईमुळे चित्रपटाच्या एकूण कलेक्शनमध्ये मोठी भर पडली आहे.

'KGF 2', 'जवान' आणि 'पठाण'ला टाकले मागे

'सॅकनिल्क'च्या आकडेवारीनुसार, जागतिक बॉक्स ऑफिसच्या सर्वाधिक कमाईच्या यादीत 'रामायण' सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या चित्रपटाने 'KGF: Chapter 2' (१,२१५ कोटी), 'जवान' (१,१६० कोटी) आणि 'पठाण' (१,०५५ कोटी) या चित्रपटांना मागे टाकले आहे. दरम्यान, एस. एस. राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटाने जगभरात १,२३० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे हा रेकॉर्ड मोडण्यासाठी 'रामायण'ला आणखी अवघ्या दोन कोटी रुपयांची कमाई करावी लागणार आहे.

'दंगल' अजूनही पहिल्या क्रमांकावर

जागतिक कमाईच्या यादीत आमिर खानचा 'दंगल' चित्रपट २,०७०.३० कोटी रुपयांच्या कमाईसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर 'धुरंधर २', 'बाहुबली २' आणि 'पुष्पा २' या चित्रपटांचा क्रमांक लागतो. आता 'रामायण' पुढील दिवसांत किती कमाई करतो आणि या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करु शकतो का? याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 2029 पंढरपूरमध्ये विहिरीचा कठडा कोसळून अपघात, चार मजूर अडकल्याची भीती

Latur Bank Election: अपहरणाच्या आरोपांनंतर काँग्रेसची सावध भूमिका, मतदारांना बसने थेट मतदान केंद्रावर आणले

8th Pay Commission: १ जानेवारी २०२६ पूर्वी रिटायर झालात? मग ८व्या वेतन आयोगाचा फायदा मिळणार की नाही? लगेचच घ्या जाणून

Refrigerator Colour Vastu: घरात फ्रिज कोणत्या रंगाचा असावा? रंगानुसार घरात पडतो पैशांचा पाऊस; वास्तुशास्त्रात सांगितलेत नियम

Bomb Threat : CSMT रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी; मुंबई पोलीस अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT