Ramayana Collection  AI PHOTO
मनोरंजन बातम्या

Ramayana Collection : 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा! १,५०० कोटींच्या उंबरठ्यावर, १३व्या दिवशी कमाईचा आकडा किती?

Ramayana Box Office Collection Day 13 : रणबीर कपूर आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'रामायण' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरूच आहे. चित्रपटाने जगभरात १,५०० कोटींच्या कमाईचा टप्पा गाठण्याच्या दिशेने मोठी मजल मारली आहे.

Shreya Maskar

रणबीर कपूर आणि यश यांच्या अभिनयाची प्रेक्षकांमध्ये चर्चा

'रामायण'ने प्रदर्शनाच्या १३ दिवसांत जगभरात १,५०० कोटींच्या कमाईकडे वाटचाल

'रामायण' चित्रपटाची जागतिक कमाई दमदार

रणबीर कपूरच्या 'रामायण: भाग १' ने जागतिक बॉक्स ऑफिसवर आपली दमदार घोडदौड सुरूच ठेवली असून चित्रपट १,५०० कोटी रुपयांच्या टप्प्याच्या जवळ पोहोचला आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपट हाउसफुल पाहायला मिळत आहे. चित्रपटातील काही दृश्य पाहून प्रेक्षक भारावून गेले आहे. चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. 'रामायण' चित्रपट ५ नोव्हेंबरला रिलीज झाला आहे.

'रामायण' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १३

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या मंगळवारी म्हणजेच १३ व्या दिवशी काहीशी घट दिसून आली. या दिवशी भारतात चित्रपटाने अंदाजे २८.७० कोटी रुपयांची नेट कमाई केली. सोमवारी झालेल्या ३२ कोटी रुपयांच्या कमाईच्या तुलनेत मंगळवारी १०.३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. मात्र, परदेशातील उत्तम कामगिरीमुळे चित्रपटाची जागतिक एकूण ग्रॉस कमाई आता १,४८३.५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

'रामायण' चित्रपटाने हिंदी भाषेत सर्वात जास्त कमाई केली आहे. हिंदी भाषेत २१ कोटी रुपयांची कमाई झाली. मल्याळम भाषेतून २.३५ कोटी रुपये, कन्नड भाषेतून २.१० कोटी रुपये, तमिळ भाषेतून १.७५ कोटी रुपये आणि तेलुगू भाषेतून १.५० कोटी रुपयांची कमाई झाली.यामुळे, 'रामायण'ची भारतातील एकूण नेट कमाई ८२१.३० कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तर भारतातील एकूण ग्रॉस कमाई ९८१.५० कोटी रुपये इतकी झाली आहे.

परदेशात, १३ व्या दिवशी चित्रपटाने १२ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण ग्रॉस कमाई ५०२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यासह, चित्रपटाची जागतिक स्तरावरील एकूण ग्रॉस कमाई १,४८३.५० कोटी रुपये झाली आहे.रामायण हा भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित पौराणिक चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले असून, नमित मल्होत्रा या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम यांच्या भूमिकेत, साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत, रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत झळकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लालपरीला दिवाळी पावली; पाच दिवसांत अमरावती विभागात ५.१० कोटींची कमाई!

Weather Update : पावसाचा जोर वाढणार! १० राज्यांना सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्रात हवामानाचा अंदाज काय? वाचा

Vande Bharat Train: पाहुण्यांना निरोप द्यायला गेले अन् ३६ हजारांचा दंड भरून आले! का बसला दंड? कुठे घडला हा प्रकार?

Plane Crash : हवेतच विमानाला आग, क्षणांत जमिनीवर कोसळून मोठा स्फोट; विमान दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू

Quad क्वाड परिषदेतील PM मोदींच्या कृत्यानं जिंकली अनेकांची मने; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT