Shreya Maskar
भारतामध्ये अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत, जी आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे, ऐतिहासिक वारशामुळे आणि अनोख्या वैशिष्ट्यांमुळे जगभर प्रसिद्ध आहेत. ही 7 ठिकाणे आयुष्यात एकदा तरी आवर्जून पाहायला जा.
गुजरातमधील कच्छचे रण हे विस्तीर्ण पांढऱ्याशुभ्र मिठाच्या मैदानासाठी प्रसिद्ध आहे. दूरवर पसरलेली पांढरी जमीन, मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे आणि पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात चमकणारे रण पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.
कर्नाटक येथे हम्पी हे सुंदर ठिकाण आहे. प्राचीन मंदिरांचे अवशेष, विशाल दगडांच्या टेकड्या आणि भव्य ऐतिहासिक वास्तू यांमुळे हम्पी हे भारतातील एक अद्वितीय पर्यटनस्थळ आहे. येथील मंदिरे पर्यटकांचे आकर्षण आहेत.
गोव्यात दुधसागर धबधबा वसलेला आहे. उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या पाण्यामुळे दुधसागर धबधबा एखाद्या दुधाच्या प्रवाहासारखा दिसतो. हिरव्यागार जंगलाच्या पार्श्वभूमीवर असलेला हा धबधबा पावसाळ्यानंतर विशेष आकर्षक दिसतो.
लडाखमधील पँगॉन्ग तलाव हे भारतातील सर्वात सुंदर पर्यटनस्थळांपैकी एक आहे. उंच पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या या तलावाच्या पाण्याचा रंग सूर्यप्रकाशानुसार बदलताना दिसतो. निळेशार पाणी, आजूबाजूचे तपकिरी डोंगर आणि शांत वातावरण यामुळे येथे भेट देण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो.
मणिपूरमधील लोकटक तलाव हे भारतातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण तलावांपैकी एक आहे. तलावावर तरंगणाऱ्या वनस्पती आणि मातीच्या थरांपासून तयार झालेल्या बेटांसारख्या रचनांना 'फुमदी' म्हणतात.
हिमालयाच्या कुशीत वसलेली व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणजे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच! या दरीमध्ये विविध रंगांची रानफुले, हिरवीगार कुरणे, डोंगर आणि सुंदर नैसर्गिक दृश्ये पाहायला मिळतात.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.