Unique Lake : निसर्गाचा चमत्कार! निळा समुद्र, हिरवं जंगल अन् मध्ये गुलाबी तलाव; 'हे' रहस्यमयी ठिकाण आहे तरी कुठे?

Shreya Maskar

युनिक तलाव

लेक हिलियर हा ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम ऑस्ट्रेलिया राज्यातील रेशर्च द्वीपसमूहातील मिडल आयलंडवर आहे. समुद्राच्या निळ्या पाण्याच्या आणि हिरव्या वनस्पतींच्या पार्श्वभूमीवर दिसणारा गुलाबी तलाव या ठिकाणाला वेगळे रूप देतो.

Unique Lake | pinterest

लेक हिलियर

या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या पाण्याला पूर्वी कँडीसारखा आकर्षक गुलाबी रंग दिसत असे. निळाशार समुद्र, हिरवीगार झाडे आणि गुलाबी तलाव यांचे दृश्य पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आले आहे.

Lake Hillier | pinterest

तलावाची लांबी

या तलावाची लांबी साधारण ६०० मीटर असून, वरून पाहिल्यावर त्याचा आकार पावलाच्या ठशासारखा दिसतो. तलावाभोवती घनदाट वनस्पती आणि जवळच हिंदी महासागराचे निळे पाणी असल्यामुळे या ठिकाणाचे सौंदर्य अधिक खुलते.

Length of the lake | pinterest

तलावाच्या पाण्याचा रंग गुलाबी का दिसतो?

तलावातील पाणी अत्यंत खारट असल्यामुळे विशिष्ट सूक्ष्मजीवांना येथे जगण्यासाठी अनुकूल परिस्थिती मिळते. विशिष्ट प्रकारच्या शैवालामुळे आणि जीवाणूंमुळे गुलाबी, लालसर रंग तयार होण्यास मदत मिळते. पाण्यातील क्षार, सूक्ष्मजीवही यात महत्त्वाचे असतात.

Why does lake water look pink? | pinterest

भेट देण्यापूर्वी काय लक्षात ठेवावे?

पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी आणि स्थानिक नियमांचे पालन करावे. तलावाचे आकाशातून दर्शन घेताना त्याचा आकार आणि समुद्राच्या निळ्या रंगाशी असलेला विरोधाभास अधिक स्पष्ट दिसू शकतो.

What to remember before visiting? | pinterest

ऐतिहासिक शोध

जानेवारी १८०२ मध्ये ब्रिटीश शोधक मॅथ्यू फ्लिंडर्स यांनी आपल्या मोहिमेदरम्यान याची नोंद केली होती.

Historical findings | pinterest

कधी भेट द्यावी?

जून ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंतचा काळ उत्तम असतो; या काळात हवामान आल्हाददायक असते. दुपारची किंवा सकाळची वेळ येथे जा.

When to visit? | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : दिवाळीत सलग ५ दिवस सुट्ट्या, फिरा मुंबई-पुण्याजवळील कमी गर्दीची 'ही' सुंदर पर्यटन स्थळे

Diwali Travel | AI PHOTO
येथे क्लिक करा...