Ram Gopal Varma movie promotion video  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dangerous: राम गोपाल वर्माच्या 'त्या' कृत्याने नेटकरी संतापले, समोर आले 'हे' कारण

राम गोपाल वर्मा आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात.

Pooja Dange

Ram Gopal Varma Movie Promotion: राम गोपाल वर्मा नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे आणि कृत्यांमुळे चर्चेत असतात. बॉलिवूडच्या टॉप डायरेक्टर्सच्या यादीत समाविष्ट असलेले राम गोपाल वर्मा सध्या फक्त साऊथ सिनेमांपुरता मर्यादित राहिले आहे. राम गोपाल वर्मा आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, त्यामुळे ते वादातही अडकतात. अशाच त्यांचा एका विचित्र कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राम गोपाल वर्माचा आगामी चित्रपट 'डेंजरस' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्याचे प्रमोशन ते अशा पद्धतीने करत आहे. त्यांच्या या कृत्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. राम गोपाल वर्माचे अभिनेत्रीसोबतचे विचित्र फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्याचा हा प्रकार कोणालाच आवडला नसून सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. (Movie)

राम गोपाल वर्मा 'डेंजरस'च्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. ते 'डेंजरस' चित्रपटातील अभिनेत्रीच्या पायाला मसाज देताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये ते खाली बसले आहेत. तसेच अभिनेत्री आशु रेड्डी सोफ्यावर बसली आहे. तर राम गोपाल वर्मा तिच्या पायाला किस करताना दिसत आहेत. ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर करत दिग्दर्शक राम गोपाल वर्माने लिहिले की, 'डेंजरस मार्क कहां है, 9:30 वाजता.' फोटोमध्ये राम गोपाल वर्मा अभिनेत्रीचा पाय हातात धरून खाली बसले आहेत आणि कॅमेराकडे पाहत आहेत. (Social Media)

राम गोपाल वर्माच्या या पोस्टवर युजर्स कमेंट करून त्यांची प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एकाने युजरने लिहिले की, 'रामू सरांना असे पाहताना मला वाईट वाटत आहे, एकेकाळी ते भारतीय चित्रपटसृष्टीचे सर्वोच्च दिग्दर्शक होते, ज्यांच्यासोबत सर्व मोठे कलाकार काम करायचे होते.' दुसऱ्याने लिहिले, 'हे काय रामू, तू असा नव्हतास, उठ.' 'डेंजरस' ही एक लेस्बियन क्राईम स्टोरी आहे, जी 9 डिसेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात अप्सरा राणी आणि नैना गांगुली मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरातच्या संस्थानला कुणी दिलं पाणी? खरातचा आणखी एक कारनामा समोर

Ashok Kharat Case: आयोग अध्यक्षपदानंतर प्रदेशाध्यक्षपदही जाणार? कॅप्टन खरात प्रकरणी चाकणकरांना अटक होणार?

पश्चिम-आशियातील युद्ध थांबणार? इराणनं PM मोदींना सांगितली युद्ध थांबवण्याची अट

जादूटोणाशी आमचा कधी संबंध आला नाही; मंत्री भरत गोगावले असे का म्हणाले?

अमरावतीत चाललंय काय? शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा वावर

SCROLL FOR NEXT