ड्रग्ज प्रकरणी ED कडून रकुल प्रीत, राणा दग्गुबातीला समन्स 
मनोरंजन बातम्या

ड्रग्ज प्रकरणी ED कडून रकुल प्रीत, राणा दग्गुबातीला समन्स

या चौघांना एकाचवेळी ईडीकडून समन्स पाठवण्यात आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - ईडीने चार वर्षे जुन्या एका ड्रग्ज प्रकरणामध्ये टॉलीवूडच्या टॉप एक्टर्स आणि डायरेक्टर्सना समन्स जारी केला आहे. यामध्ये रकुल प्रीत सिंह Rakul Preet, राणा दग्गुबाती, Rana Daggubati रवि तेजा Ravi Teja आणि पुरी जगन्नाथ Puri Jagannath यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या चौघांना एकाचवेळी ईडीकडून समन्स पाठवण्यात आले आहेत.

हे देखील पहा -

६ सप्टेंबर रोजी रकुल प्रीत सिंहला, ८ सप्टेंबर राणा दग्गुबातीला, ९ सप्टेंबर रवि तेजाला तर ३१ सप्टेंबरला पुरी जगन्नाथला ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. आतापर्यंत या ड्रग्ज प्रकरणात १२ लोकांना समन्स पाठवण्यात आले आहेत.हे प्रकरणतेलंगणाच्या उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित आहे. जुलै २०१७ साली या विभागाद्वारे एका बारमध्ये छापा टाकला होता. झाडाझडतीनंतर या ठिकाणी वेगवेगळी १२ प्रकरणे समोर आली होती.

या प्रकरणांवर ११ चार्जशीट दाखल करण्यात आल्या होत्या. आता रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबती, रवी तेजा आणि पुरी जगन्नाथ यांची नावे सोमार येत आहे. मात्र, ते मनी लाँडरिंग प्रकरणामध्ये सामील आहेत की नाही याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, अशी माहिती एजन्सीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple New CEO: Appleचे CEO बदलणार; १५ वर्षानंतर टिम कुक देणार राजीनामा; कोण सांभाळणार धुरा?

ऐन उन्हाळ्यात पाणीबाणी; मुंबई, ठाण्यात २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

Crime: ९ महिन्यांच्या गरोदर महिलेची हत्या, पोटातील बाळाचाही मृत्यू; सोलापूर हादरले

Maharashtra News Live Update: बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांचे जोरदार आंदोलन..

Latur Crime: गॅसवर स्वयंपाक का केला? सासरच्यांकडून सुनेचा छळ; महिलेने दोन चिमुकल्या मुलांसह संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT