Rakhi Sawant Birthday: Saam tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Birthday: दोन लग्ने झाली, दोन्हीही संसार मोडले,४५ वर्षांची राखी सावंत जगतेय 'सिंगल' आयुष्य

Bollywood actress Rakhi Sawant News in Marathi: राखी सावंत बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. राखीने अनेक हिंदी चित्रपटात आयटम साँगपासून अभिनय देखील केला आहे.

Vishal Gangurde

Actress Rakhi Sawant Birthday:

राखी सावंत बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. राखीने अनेक हिंदी चित्रपटात आयटम साँगपासून अभिनय देखील केला आहे. राखी रोखठोक बोलण्यासाठीही प्रसिद्ध आहे. रोखठोक बोलणारी राखी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असते. याच राखीचा आज वाढदिवस आहे. (Latest Marathi News)

राखी सावंत 'बिग बॉस'मध्येही दिसली होती. राखीच्या 'बिग बॉस'मधील होणाऱ्या वादामुळे नेहमी चर्चेत राहिली. राखीचा २५ नोव्हेंबरला वाढदिवस असतो. राखीने दोनदा लग्न केलं. मात्र, राखीला नशिबाने साथ दिली नाही. त्यामुळे आज ४५ वर्षांची राखी सिंगल आयुष्य जगत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राखी सावंतने एक लग्न कोणालाही कुणकुण न लागता केलं होतं. राखीने आतापर्यंत दोन लग्ने केली आहे. मात्र, तिचे दोन्ही संसार मोडले. राखीने 'बिग बॉस 15'मध्ये पती रितेशचा परिचय करून दिला होता. रितेशचं आधीच लग्न झालं होतं. त्याला मुलंही आहेत.

'बिग बॉस' आणि वाद

'बिग बॉस'मधून बाहेर पडल्यानंतर राखी आणि रितेश वेगळे झाले होते. दोघांनी एकमेकांवर आरोप केले होते. त्यानंतर राखी सावंत २०२२ मध्ये आदिल दुर्रानीला डेट करत होती. त्या दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात राखीने लग्नानंतर फातिमा नाव देखील केलं होतं. मात्र, या दोघांचंही नातं फार काही टिकलं नाही.

राखीने आदिलच्या विरोधात मारहाणीचाही आरोप केला होता. त्याच्याविरोधात राखीने गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर आदिलला काही दिवसांची तुरुंगवारी झाली होती.

राखीने स्वत: निर्माण केली ओळख

राखी सावंतने तिच्या आयुष्याशी संबंधित सर्व निर्णय त्यांनीच घेतले आहे. करिअरच्या सुरवातीला राखीला अनेक नकार पचवावे लागले. मात्र, त्याचा परिणाम राखीवर झाला नाही. राखीने १९९७ साली 'अग्निचक्र' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

राखीने आतापर्यंत सर्व अभिनेत्यांसोबत सिनेमात काम केलं आहे. राखीने रास्ते है प्यार के, जिस देश मे गंगा रहता है, मै हू ना, जोरू का गुलाम या सारख्या चित्रपटात काम केलं आहे. राखीचं आयुष्य २००३ मधील 'मोहब्बत है मिर्ची' या गाण्यामुळे प्रसिद्धी झोतात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

SCROLL FOR NEXT