Rakhi Sawant-Adil Khan Marriage Controversy  Instagram @rakhisawant2511
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant-Adil Khan Wedding: आधी नकार अन् मग होकार... काय आहे नेमकं आदिलच्या मनात?

राखी सावंत-आदिलच्या लग्नाला होतोय कुटुंबियांचा विरोध.

Pooja Dange

Rakhi Sawant-Adil Khan Wedding Controversy: अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या राखी तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. राखीने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. राखी आणि आदिल खान दुर्रानी यांच्या बातमी खरी आहे की खोटी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण आदिलने हे लग्न मान्य नसल्याचे म्हटले होते. आता त्याने हे लग्न कबूल केले आहे. परंतु आदिलचे कुटुंबीय या लग्नच्या विरोधात आहेत.

राखी सावंतने आदिल दुर्रानीसोबतच्या तिच्या लग्नाचा खुलासा केला होता, ज्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. यानंतर राखी उघडपणे तिच्या लग्नाबद्दल बोलत होती, तेव्हा आदिलने त्यास नकार दिला होता. मात्र, त्यानंतर त्याने काहीही स्पष्ट करण्यासाठी थोडा वेळ मागितला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदिलने राखी सावंतसोबतचे लग्न मान्य केले आहे. तसेच त्याने सांगितले की, तो त्याच्या कुटुंबाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे.

आदिल मुलाखती दरम्यान म्हणाला, 'माझे आणि राखीचे लग्न झाले आहे आणि आम्ही दोघेही एकत्र आनंदी आहोत. याची माहिती कुटुंबीयांना आहे, मात्र त्यांनी अद्याप ते मान्य केले नसून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधी मी हे नाकारत होतो, पण नंतर वाटलं की जिथे राखी आहे तिथे कॉन्टोवर्सी होतेच. अशा स्थितीत मला वाटले की, मीडियामध्ये इतक्या गोष्टी घडत असताना लग्नाची बाब मान्य करायला हरकत नाही.' यावेळी आदिलसोबत राखीही तिथे उपस्थित होती.

राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांनी सात महिन्यांपूर्वी लग्न केले होते. एवढेच नाही तर राखीने तिचे नाव बदलून फातिमा केले होते. मात्र जेव्हा तिच्या लग्नाची बातमी मीडियामध्ये आली तेव्हा आदिलने त्याला विरोध केले. राखीची आई कॅन्सरवर उपचार घेत आहे, त्यामुळे तिला आदिलच्या या कृत्यामागचे कारण समजू शकले नाही. ती खूप अस्वस्थ होती. आता आदिलने राखीसोबत निकाह स्वीकारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यसभेत शरद पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

अंजनगाव पुतळा प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून बाळराजे आवारे पाटील यांना अटक

Belly Fat: वजन होईल एका आठवड्यात कमी, सकाळच्या नाश्त्यात बनवा भाज्यांचे थालीपीठ

Salman Khan : 3,225 कोटींचा मालक अन् पायात फाटके बूट; सलमान खानची अवस्था पाहून चाहते चक्रावले, VIDEO होतोय व्हायरल

Gold Rate Today: खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं १८००० रुपयांनी स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT