Raju Srivastava Health Update | मुंबई : कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव याची (Raju Srivastava) प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. राजू बुधवारी जीममध्ये वर्कआउट करताना ट्रेडमीलवरून अचानक खाली कोसळला होता. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.
राजू श्रीवास्तवची प्रकृती चिंताजनक असल्याने चाहतेही चिंतेत आहेत. व्यायाम करताना ट्रेडमीलवरून खाली कोसळल्यानंतर तातडीने त्याला दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. राजू श्रीवास्तव लवकरात लवकर बरा व्हावा, त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत. राजूच्या प्रकृतीबाबत आज, गुरुवारी एक अपडेट आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तवला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे, असे सांगितले जात आहे. इमर्जन्सी मेडिसीन विभागाच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला कार्डियाक केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले असून, एन्जिओग्राफीमध्ये त्याच्या हृदयात १०० टक्के ब्लॉक्स आढळून आल्याचे बोलले जात आहे.
कॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की, राजू श्रीवास्तव दिल्लीत काही बड्या नेत्यांना भेटायला आला होता. सकाळी व्यायाम करताना त्याला हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला. त्यानंतर त्याला तातडीने नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती खालावली असून, कुटुंबीय आणि देशभरातील त्याचे कोट्यवधी चाहते चिंतेत आहेत.
जीममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका किंवा प्रकृती बिघडण्याची ही पहिलीच वेळ नाही. साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार याचं अवघ्या ४६व्या वर्षी निधन झालं होतं. अभिनेता पुनीत यालाही हृदयविकाराचा झटका आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.