Rajkummar Rao SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rajkummar Rao : 'Stree 2' मधून काढून टाकण्यात आलेले Funny सीन्स; राजकुमारचा लूक पाहून पोट धरून हसाल

Stree 2 Funny Scene : 'स्त्री 2' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. खूप कमी वेळात या चित्रपटाने जास्त कमाई केली आहे. अशात बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने 'स्त्री 2' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे त्याचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र 'स्त्री 2' ( Stree 2) ची सर्वत्र चर्चा सुरू आहे. बॉलिवूड स्टार्स राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा 'स्त्री 2' भलताच प्रेक्षकांच्या पसंतीच उतरला आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित करण्यात आला. 'स्त्री 2'च्या कमाईमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरात बॉक्स ऑफिसवर आपला ठसा उमटवत आहे. नुकताच राजकुमार रावने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून खास फोटो पोस्ट करून सर्वांच लक्ष वेधून घेतल आहे.

इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) सध्या 'स्त्री 2' चर्चेत आहे. अशात अभिनेता राजकुमार राव याने मंगळवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'स्त्री 2' चित्रपटाशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. राजकुमार रावने त्याचे दोन खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये राजकुमार राव एका वेगळ्य अंदाजात पाहायला मिळत आहे. राजकुमार रावने या फोटोमध्ये लाल क्रॉप-टॉप आणि मिनी ब्लू स्कर्ट परिधान केलेला दिसत आहे. यासोबत त्याने गोल्डन शिमरी श्रग घातला आहे. लांब केसांचा विग, गोल्डन हिल घालून हा लूक पूर्ण केला आहे. तसेच मिनिमल मेकअप देखील केला आहे. राजकुमार रावने कॅप्शनमध्ये लिहिले की,'हा माझा चित्रपटातील आवडता सीन आहे. पण हा सीन अंतिम टप्प्यात आला नाही. तुम्हाला हा सीन चित्रपटात बघायचा आहे का? तुम्ही सर्वांनी सांगा?' त्याखाली राजकुमार रावने दिग्दर्शक अमर कौशिक यांना टॅग केले आहे.

बॉक्स ऑफिसवर 'स्त्री 2' ची कमाई

अमर कौशिक दिग्दर्शित राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर 12-13 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 420 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. जगभरात 'स्त्री 2' ने 590 कोटींची कमाई केली आहे. आगामी काळातही हा चित्रपट बंपर कलेक्शन करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT