Influencer Anita Bishnoi instagram
मनोरंजन बातम्या

Influencer Anita Bishnoi: रडत लाईव्ह आली अन् उचललं टोकाचं पाऊल; इन्फ्लुएंसर अनीता बिश्नोईचा लाईव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

Influencer Anita Bishnoi: राजस्थानमधील इन्फ्लुएंसर अनीता बिश्नोईने ट्रोलिंगच्या मानसिक ताणामुळे इंन्स्टा लाईव्हवर विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Shruti Vilas Kadam

Influencer Anita Bishnoi: सोशल मीडियावर दिसणार सगळच सत्य आणि सुंदर असतं असं नाही. सोशल मिडियाच्या झगमगाटामागे एक कटू वास्तव एक काळी बाजू देखील असते या काळ्याबाजूत अनेक इन्फ्लुएंसर हालाकीने आपलं आयुष्य जगत असतात.नुकतचं सोशल मीडियाच्या झगमगाटामागे दडलेली कटू वास्तवता पुन्हा एकदा समोर आलं आहे. राजस्थानमधील जोधपूर येथील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अनीता बिश्नोईशी संबंधित एक धक्कादायक घटना सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावरील सततच्या ट्रोलिंगला कंटाळून तिने इन्स्टा लाईव्हवर येऊन विष प्राशन केल्याची घटना घडली. या घटनेनंतर सोशल मीडियावरील सायबर बुलिंग आणि मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनीता बिश्नोई गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करत होती. तिच्या एका ड्रेसवरून आणि सोशल मीडिया पोस्टवर तिला ट्रोल करण्यात आले होते. काहींनी त्यांच्याविरोधात रोस्ट व्हिडीओ तयार करून टीका केली. या सततच्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे त्या मानसिकदृष्ट्या खचली होती.

घटनेपूर्वी अनीताने सोशल मीडियावर लाईव्ह येत आपल्या भावना व्यक्त केल्या. या लाईव्हदरम्यान ती खूप भावुक झाली. ट्रोलिंगमुळे होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल बोलताना ती सोशल मिडियावर खूप रडली. अनीताने 'आता तुमची बहीण तुमच्यासोबत राहणार नाही...' असं म्हणत एक पोस्ट केली होती. या पोस्टनंतर काही वेळातच लाईव्ह येऊन तिने विष प्राशन केल्याची बातमी समोर आली. अनीताची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून, तिच्या प्रकृती आता कशी आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

या प्रकरणामुळे सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या आहेत. अनेक नेटकरी तिने खपू मानसिक त्रास सहन केला. तिला ट्रॉलिंग करु नका किंवा कोणते कपडे घालायचे हे प्रत्येकाचे पर्सनल निर्णय असतात. अशा कमेंट करत आहेत. तर काही नेटकरी लाईव्हवर येऊन असला प्रकरा करायला नव्हता पाहिजे. सोशल मिडिया स्टंटचा हा प्रकार आहे अशा कमेंट करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silent Heart Attack: या 6 व्यक्तींना सायलेंट हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो?

Maharashtra News Live Update: भिमाशंकरच्या दुरवस्थेवर सुप्रिया सुळेंची टीका; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार

Manoj Jarange : मोठी बातमी! एकनाथ शिंदें आज परभणी दौऱ्यावर, मनोज जरांगेंनी दिला इशारा

Bonus 2026 : दसऱ्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट? ₹7,000 ऐवजी मिळणार ₹21,000

Chutneys for weight loss: काही केल्या पोटावरची चरबी जातच नाहीये? या 5 प्रकारच्या चटणी करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT