Raja Shivaji Review: अभिनेता रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेल्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच मोठी चर्चा निर्माण केली होती. आज, १ मे रोजी, हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अनेक प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला असून, आपल्या प्रतिक्रिया 'X' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यक्त करत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाला चाहत्यांनी कसा प्रतिसाद दिला आहे. ते जाणून घ्या.
कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक
एका नेटकऱ्याने चित्रपटाचे भरभरून कौतुक केले असून, 'X' वर लिहिले आहे की, रितेश देशमुखने आपल्या लेखन आणि दिग्दर्शन कौशल्याच्या जोरावर 'राजा शिवाजी' हा चित्रपट अत्यंत खुबीने साकारला आहे. या चित्रपटामुळे मराठा साम्राज्याचे राजे शिवाजी महाराजांवर आधारित आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि संजय दत्त यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे.
चित्रपटाचे संगीत नेटकरी भारावले
एका नेटकऱ्याला चित्रपटाचे संगीत आवडले असून, त्यांनी लिहिले आहे की 'राजा शिवाजी'चे साउंडट्रॅक अप्रतिम आहे. त्याने या संगीताचे वर्णन "भव्य वाद्यवृंदासारखे" (grand orchestra) असे केले आहे. चांगले संगीत चित्रपटाची एकूण गुणवत्ता वाढवते असे त्याने लिहीले आहे.
सलमानचा 'कॅमिओ' खूप आवडला
अनेक नेटकऱ्यांनी 'राजा शिवाजी' मधील सलमान खानच्या कॅमिओ कौतुक केले आहे. एका नेटकऱ्यांने लिहिले की, चित्रपटातील सलमान खानची भूमिका जबरदस्त आहे. पडद्यावरील त्याची उपस्थिती अत्यंत प्रभावी आहे आणि त्याने उत्तम काम केले आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्यांने लिहिले, "अरे बापरे! सलमान खानच्या भूमिकेला १० पैकी १० माझ्याकडून
एका नेटकऱ्याला सलमानची भूमिका आवडली नाही
याउलट, एका नेटकऱ्याला चित्रपटातील सलमान खानची भूमिका फारशी आवडली नाही. त्यांनी लिहिले, "आजकाल सलमान खान जवळपास प्रत्येक चित्रपटात अशा पाहुण्या भूमिकांमध्ये का दिसतो, हे मला अजिबात समजत नाही. 'राजा शिवाजी'चा एकूण सूर आधीच गंभीर आणि ऐतिहासिक आहे. अशात त्याची ही भूमिका काहीशी विसंगत किंवा खटकणारी वाटते."
हा चित्रपट किती भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे?
रितेश देशमुखने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासोबतच, दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. ज्योती देशपांडे आणि जेनेलिया डिसूझा या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम यांसारख्या अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.