Raja Shivaji Collection Saam tv
मनोरंजन बातम्या

Riteish-Raja Shivaji Collection: रितेश भाऊंच्या 'राजा शिवाजी'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई; २७ व्या दिवशीही केलं छप्परफाड कलेक्शन

Riteish - Raja Shivaji Collection: 'राजा शिवाजी' या चित्रपटात रितेश देशमुख मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट दररोजच दमदार कमाई करत आहे. चला जाणून घेऊया, या चित्रपटाने २७ व्या दिवशी किती कमाई केली.

Shruti Vilas Kadam

Riteish - Raja Shivaji Collection: 'राजा शिवाजी' हा चित्रपट रितेश देशमुखच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक म्हणून समोर आला आहे. या चित्रपटाचे प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्व विक्रम मोडीत काढत, या चित्रपटाने एकूण ११० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या २७ व्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कमाई जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी'ची २७ व्या दिवसाची कमाई

'Sacnilk' च्या माहितीनुसार, या चित्रपटाने आपल्या २७ व्या दिवशी २९ लाख रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचे ५४२ शोजमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. आणि त्याला १८ टक्के प्रेक्षक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे, चित्रपटाची एकूण 'नेट' कमाई ९३.१९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने ११०.१५ कोटी रुपयांची 'ग्रॉस' (एकूण) कमाई साध्य केली आहे.

'राजा शिवाजी'ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ११.३५ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने १०.५५ कोटी रुपये जमवले. तिसऱ्या दिवशी कमाईत वाढ झाली आणि ती १२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. चौथ्या दिवशी चित्रपटाने ५.६ कोटी रुपयांची कमाई केली. पाचव्या दिवशी ४.९ कोटी रुपये आणि सहाव्या दिवशी ४.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय या चित्रपटाने केला. सातव्या दिवशी चित्रपटाची कमाई ४ कोटी रुपयांवर स्थिरावली.

पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने ५२.६५ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात २४.३० कोटी रुपये आणि तिसऱ्या आठवड्यात १२ कोटी रुपयांची कमाई झाली. विशेष बाब म्हणजे, 'सैराट' चित्रपटाने यापूर्वी प्रस्थापित केलेला विक्रम मोडत काढत, 'राजा शिवाजी' हा मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

'राजा शिवाजी' या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुखने केले असून, त्यानेच यात मुख्य भूमिकाही साकारली आहे. रितेश यात 'छत्रपती राजा शिवाजी' यांच्या भूमिकेत दिसतो. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि त्यांच्या आयुष्यातील संघर्षाची गाथा रुपेरी पडद्यावर मांडतो. या चित्रपटात जेनेलिया देशमुखनेही काम केले असून तिने सईबाई महाराणींची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, विद्या बालन आणि सलमान खान यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. यासोबतच, रितेशचा मुलगा राहिलनेही या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट्स करणं पडलं महागात; मुंबई उच्च न्यायालयाचा नेत्याला दणका!

Maharashtra Politics: सहा दिवसांत दोनदा भेटी, NDAत प्रवेशासाठी? विलिनीकरणामुळे NDA प्रवेशाचं घोडं अडलं?

'शेतकऱ्यांना त्रास झालेला चालेल, उद्योजकांना नको'; गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान

Pune Police Crime: खाकीवर काळा डाग! पुणे पोलीस झाले दरोडेखोर; व्यावसायिकाचे 1 कोटी लुटण्याचं बिंग फुटलं

Fact Check: इन्स्टाग्राम बंद होणार? इन्स्टावरील बंदीमुळे फॉलोअर्सचं काय?

SCROLL FOR NEXT