Sharmila Thackeray Urfi Javed Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Controversy: 'मी पूर्ण कपड्यात फिरते...' शर्मिला ठाकरेंनी उर्फीला लगावला टोला

उर्फी जावेद अंगप्रदर्शन प्रकरणी आता शर्मिला ठाकरे यांनी उर्फीला टोला लगावला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sharmila Thackeray On Urfi Javed: उर्फी जावेद आणि तिच्या कापडयांवरून चालू असलेला वाद आता नवीन राहिलेला नाही. चित्रा वाघ यांनी सुरू केलेल्या या वादात काही राजकीय महिला नेत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी उर्फीला विरोध केला, तर काहींनी तिला पाठिंबा दिला. उर्फीच्या अंगप्रदर्शन प्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी कळंबोलीमध्ये आयोजित कळंबोली चषक स्पर्धेला हजेरी हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांनी शर्मिला ठाकरे यांना उर्फी जावेद वाद प्रकरणी विचारले असता मिश्किल टोला लगावत त्या म्हणाल्या की, 'मी पूर्ण कपड्यात फिरते बाकीच्यांचं मला माहित नाही.' शर्मिला ठाकरे यांनी उर्फीला मारलेल्या मार्मिक टोल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या शाब्दिक वाद सोशल मीडिया पुरता मर्यादित राहिलेला नाही. चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात मुंबई पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर आंबोली पोलीस ठाण्यात उर्फीची तीन तास चौकशी करण्यात आली. तेव्हा उर्फीने पोलिसांना सांगितले की, 'मी फॅशन इंडस्ट्री मधून असल्यामुळे माझं राहणं , माझं दिसणं ही माझ्या व्यवसायाची ही गरज आहे. चित्रा वाघ यांनी मारण्याची धमकी दिली आहे.'

चित्रा वाघ यांच्या या तक्रारीनंतर उर्फीने देखील चित्रा वाघ यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. यासर्वात उर्फीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सर्वसामान्यांना थक्क करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : २०० फूट खोल दरी, उंच कातळभिंती अन् अंधारलेली वाट; मुंबईजवळ लपलंय 'हे' रहस्यमय ठिकाण

Maharashtra News Live Update: सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख

Lack of sleep: 8 तासांपेक्षा कमी झोप घेताय? हे गंभीर आजार होण्याचा वाढतो धोका

Veen Doghatli Hi Tutena : राजवाडेंचा रोमँटिक अंदाज अन् कँडल लाईट डिनर डेट; समर देणार स्वानंदीला गोड सरप्राईज, VIDEO एकदा पाहाच

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, ६ जिल्ह्यांना येलो अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT