Raj Kundra And Shilpa Shetty At Siddhivinayak Mandir  Saam TV
मनोरंजन बातम्या

Raj Kundra - Shilpa Shetty: राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी सिद्धिविनायकाच्या चरणी, 'UT-69' रिलीज होण्यापूर्वी घेतलं बाप्पाचं दर्शन

UT 69 Movie: शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा त्याचा आगामी चित्रपट 'UT ६९'मुळे चर्चेत आहे.

Pooja Dange

Raj Kundra At Siddhivinayak Temple:

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा त्याचा आगामी चित्रपट 'UT ६९'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट राज कुंद्राच्या आर्थर रोड जेलमधील अनुभवावर आधारित आहे. ३ नोव्हेंबर २०२३ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या राज कुंद्राने शिल्पा शेट्टी आणि त्याच्या कुटुंबासह मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रानी हातात हात धरून सिद्धिविनाकायच्या मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी शिल्पा शेट्टीची आई आणि राज कुंद्राचे पालक देखील त्यांच्यासोबत होते. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी राज कुंद्रा सिद्धिविनायकाकडे साकडं घालायला गेला असे म्हटले जात आहे.

यावेळी शिल्पाने सफेद टॉप आणि प्लाजो घातला होता. तर राज कुंद्राने देखील सफेद सदरा आणि जीन्स घातली होती.

शिल्पा शेट्टी अनेकदा देवाच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसते. शिल्पा गेली अनेक वर्षे लालबागच्या राजाच्या दर्शनाला सुद्धा जाते. नवरात्रीत तिने घरामध्ये देवीचा घट बसवला होता. तसेच घरी 'कन्या पूजन' देखील केले होते. (Latest Entertainment News)

चित्रपटाला यश मिळावे यासाठी अनेक सेलिब्रिटी देवांचे दर्शन घेताना दिसत आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील 'कौन बनेगा करोडपती' सुरु होण्याआधी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते. स्वप्नील जोश, उर्फी जावेद, कार्तिक आर्यन, राम चरणसह अनेक कलाकार सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झाले आहेत. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tara Sutaria-Veer Pahariya Breakup: तारा सुतारिया-वीर पहाडिया यांचा ब्रेकअप? गायकाला किस करणं पडलं महागात

Viral Video : नागमणी घेतल्याशिवाय जाणार नाही वाटतं...; महामार्गावर मध्यरात्री तरुणींचा नागीण डान्स, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स; VIDEO व्हायरल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची चिंता वाढली, ३० लाख महिलांना ₹१५०० मिळणार नाहीत; तुमचंही नाव आहे का?

Valentine Day Love Letter: 'प्रेम हे फक्त प्रेम असतं, पहिलं-दुसरं असं काही नसतं'

Today Panchang: आजचे पंचांग आणि राशीसंकेत: शुक्रवार कोणासाठी ठरणार फायदेशीर?

SCROLL FOR NEXT