Raid 2 Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Raid 2 Box Office Collection : अजय देवगणच्या 'रेड 2'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच, रचला नवा विक्रम

Raid 2 Box Office Collection Day 16 : अजय देवगणचा 'रेड 2' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने नवीन रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. चित्रपटाचे १६व्या दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

अजय देवगण ( Ajay Devgn) आणि रितेश देशमुख ( Riteish Deshmukh) यांचा 'रेड 2' (Raid 2) चित्रपट रिलीज होऊन आता 16 दिवस पूर्ण झाले आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'रेड 2'ने अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. 'रेड 2' चित्रपट 1 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाच्या 16व्या दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात. चित्रपटाने तिसऱ्या शुक्रवारी देखील बंपर कमाई केली आहे.

अजय देवगणचा नवीन रेकॉर्ड

'रेड २' चित्रपट अजय देवगणचा सर्वाधिक कमाई करणारा 8 वा चित्रपट आहे. सिंघम अगेन, तान्हाजी: द अनसंग वॉरियर, दृष्टीम 2, गोलमाल अगेन आणि टोटल धमाल हे अजय देवगणचे सर्वाधिक कमाई करणारे टॉप ५ चित्रपट आहे. 'रेड २' चित्रपट भविष्यात कितीचा व्यवसाय करतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.

'रेड 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 16

  • दिवस पहिला - 19.25 कोटी

  • दिवस दुसरा - 12 कोटी

  • दिवस तिसरा - 18 कोटी

  • दिवस चौथा - 22 कोटी

  • दिवस पाचवा - 7.50 कोटी

  • दिवस सहावा - 6.75 कोटी

  • दिवस सातवा - 4.52 कोटी

  • दिवस आठवा - 5.33 कोटी

  • दिवस नववा - 5 कोटी

  • दिवस दहावा - 8 कोटी

  • दिवस अकरा - 11.75 कोटी

  • दिवस बारावा - 4.85 कोटी

  • दिवस तेरावा - 2.6 कोटी

  • दिवस चौदा - 3.35 कोटी

  • दिवस पंधरा - 3 कोटी

  • दिवस सोळावा - 3 कोटी

  • एकूण - 139.35 कोटी

'रेड 2' स्टारकास्ट

'रेड 2' हा ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. तर रितेश देशमुखने खलनायकाची भूमिकाची साकारली आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. यात वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला आणि सुप्रिया पाठक यांचा समावेश आहे. 'रेड 2' चित्रपट राज कुमार गुप्ता दिग्दर्शित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

SCROLL FOR NEXT