Raha kapoor ranbir kapoor and alia bhatt Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raha Kapoor : राहा कपूरने दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा ; व्हिडीओ झाला व्हायरल

Raha Kapoor Wishes : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी २०२३ च्या ख्रिसमसला त्यांची मुलगी राहाला जगासमोर आणले आणि यावर्षी राहा पहिल्यांदाच पापाराझींसोबत संवाद साधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Raha Kapoor : गेल्यावर्षी ख्रिसमसला, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांची मुलगी राहा कपूर हिची ओळख करून दिली होती. ज्यामुळे पहिल्यांदाच तिचा चेहरा रिव्हिल झाला होता. या वर्षी, कपूर हाऊसच्या पारंपारिक ख्रिसमस लंचमध्ये जाण्याआधी पुन्हा एकदा रणबीर आणि आलिया मुलगी राहा कपूर सोबत दिसली पण यावेळी राहाने दिलेल्या शुभेछ्यांमुळे तिचे विशेष कौतुक होत आहे.

रणबीर आणि आलिया मुलगी राहा कपूर चा एक व्हिडीओ सोहळा मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राहा त्यांच्या कारमधून बाहेर पडण्यापूर्वी, आलिया फोटोग्राफर्सना आवाज कमी ठेवण्याची विनंती करताना दिसली, आलिया यावेळी कृपया ओरडू नका ती घाबरेल असे पापाराझींना सांगत होती.काही क्षणांनंतर, रणबीर राहासोबत बाहेर पडला आणि राहाने सर्वांना हात हलवून आणि आनंदाने "मेरी ख्रिसमस" असे म्हणत एका गोड स्मितहास्य देत मने जिंकली. परत जाताना, राहाने पुन्हा कॅमेरे समोर स्मित हास्य देत पापाराझींना हात हलवून बाय केले.

पांढऱ्या पार्टी फ्रॉक घातलेली राहा अगदी गोड दिसत होती. आई आलियाने लाल वनपिस ड्रेस परिधान केला होता, जो ख्रिसमसच्या वातावरणाला साजेसा होता, तर रणबीरने पांढऱ्या टी-शर्ट, मॅचिंग पँट आणि काळ्या पट्टेदार शर्टमध्ये क्लासिक पण स्टायलिश ड्रेस ठेवला होता.

बॉलिवुडचे 'हे' कपल, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी १४ एप्रिल २०२२ रोजी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी एका खाजगी समारंभात लग्न केले. या लग्नाला जवळचे कुटुंब आणि मित्र उपस्थित होते. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी या कपलने त्यांची मुलगी राहा कपूरचे स्वागत केले. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT