Raghav and Shehnaaz Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raghav and Shehnaaz: राघव जुयाल-शहनाज गिल रिलेशनशिपमध्ये? बर्थडे पार्टीनंतरची 'ती' मूव्हमेंट कॅमेऱ्यात कैद

Raghav and Shehnaaz: राघव जुयालच्या वाढदिवसाच्या पार्टीत शहनाज गिलसोबतचा त्याचा खास बॉन्ड पाहून सोशल मीडियावर रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आले. व्हायरल व्हिडिओमुळे चाहते विविध अंदाज व्यक्त करत आहेत.

Shruti Vilas Kadam

Raghav and Shehnaaz: राघव जुयाल सध्या त्याच्या अभिनयामुळे विशेष चर्चेत आहे. 'किल' आणि 'बॅड्स ऑफ बॉलिवुड' यांसारख्या कामांमधील दमदार भूमिकांमुळे त्याने अभिनेता म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. १० जुलै रोजी राघवने मुंबईत मित्रपरिवारासोबत वाढदिवस साजरा केला. मात्र, या पार्टीपेक्षा अधिक चर्चा रंगली ती त्याच्यासोबत दिसलेल्या अभिनेत्री शहनाज गिलमुळे.

राघवच्या बर्थडे सेलिब्रेशनला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. यामध्ये आर्यन खानचाही समावेश होता. पार्टी संपल्यानंतर सर्वजण बाहेर पडत असताना पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कैद केले. याच वेळी राघव आणि शहनाज यांच्यातील सहज संवाद आणि त्यांचा बॉन्ड अनेकांच्या नजरेत भरला.

पार्टीच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर चाहत्यांची आणि पापाराझींची गर्दी होती. या गोंधळात राघव शहनाजची काळजी घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर दोघे कारमध्ये बसताना देखील एक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शहनाज सुरुवातीला राघवच्या अगदी जवळ बसलेली दिसते आणि नंतर ती बाजूच्या सीटवर सरकते. पण पाहताना असं वाटतं की ती त्याच्या मांडीवर बसली होती. या काही सेकंदांच्या व्हिडिओवरून सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनशिपबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी दोघांची जोडी आवडल्याचे म्हटले आहे, तर काहींनी त्यांच्या मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, या चर्चांबाबत राघव किंवा शहनाज या दोघांकडूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

राघव जुयालचे अभिनेत्री निहारिका एनएमसोबत नुकतेच काही रोमँटिक फोटो व्हायरल झाले होते. दोघांच्या अफेअरचीही चर्चा सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात रंगली होती. नंतर दोघांचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असल्याचं चाहत्यांना कळलं. लवकरच राघव 'भाई तेरा स्टार है' मध्ये झळकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper: मुंबई-बंगळुरू प्रवास आता आणखी सुसाट! देशातील दुसरी 'वंदे भारत स्लीपर' तयार; किती डबे अन् मार्ग कोणता?

मिमिक्री अर्टिस्ट बोलायला लागले; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला

Health Care : महिनाभर केळी खाल्ली तर शरीवर काय परिणाम होतो?

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

BSNL Satellite Phone : iPhone पेक्षाही महाग BSNL चा सॅटेलाइट फोन! नेटवर्कशिवायही करता येणार कॉल

SCROLL FOR NEXT