Pushpa 2 Box Office Collection Day 6 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Box Office Collection Day 6: 'पुष्पा'नं चारली जवान अन् ॲनिमलला धूळ, 6 व्या दिवशी सिनेमाची तगडी कमाई

Pushpa 2 Collection : 'पुष्पा राज' सध्या अवघ्या जगावर राज्य करत आहे. त्यांनी बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या 6 व्या दिवशी अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र पुष्पा भाऊचा राज्य पाहायला मिळत आहे. 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने जगाला वेड लावले आहे. या चित्रपटात जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळत आहे.

'पुष्पा 2' चित्रपट पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. आता पुष्पाने बॉलिवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. 'पुष्पा 2' चित्रपट सुकुमार दिग्दर्शित आहे.

'पुष्पा 2' ऑफिस कलेक्शन दिवस 6

मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' ने पहिल्या दिवशी 164.25 कोटी रुपये तर दुसऱ्या दिवशी 93.8 कोटी रुपये कमावले आहे. चित्रपटाच्या तिसऱ्या दिवशी 119.25 कोटींची कमाई झाली. या चित्रपटाने वीकेंडला तर धुमाकूळ घातला. चित्रपटाने चौथ्या दिवशी 141.5 कोटींची तगडी कमाई केली. चित्रपटाच्या पाचव्या दिवशी म्हणजे सोमवारी 'पुष्पा 2'ने 65.1 कोटी रुपये कमावले असून आज चित्रपटाच्या सहाव्या दिवशी (Pushpa 2 Box Office Collection Day 6) 52.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.तसेच पेड प्रिव्ह्यूजमध्ये 10.65 कोटी रुपये कमावले.

'पुष्पा 2' चित्रपटाने सहाव्या दिवशी तेलुगूमध्ये 11 कोटी रुपये, हिंदीमध्ये 38 कोटी रुपये, तामिळमध्ये 2.60 कोटी रुपये, कन्नडमध्ये 0.4 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 0.5 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाचे एकूण 6 दिवसांचे कलेक्शन 645.95 कोटी रुपये झाले आहे.

'पुष्पा 2'ने आतापर्यंत गदर 2, ॲनिमल, बाहुबली 2, स्त्री 2, पठाण आणि जवान या मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun ) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची केमिस्ट्रीने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT