Pushpa 2 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Box Office Collection Day 4: बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा'चा जलवा; वाचा संडे कलेक्शन

Pushpa 2 Sunday Collection : जगभरात दिवसेंदिवस 'पुष्पा 2' ची क्रेझ वाढत जात आहे. संडेला 'पुष्पा 2' चित्रपटाने किती कमावले जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या बॉक्स ऑफिसवर साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2:द रुल' चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला रिलीज झाला. या चित्रपटाने तीन दिवसातच जगभरात 500 कोटींची टप्पा पार केला.

'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2 ) चित्रपटात मुख्य भूमिकेत साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna ) देखील पाहायला मिळत आहे. 'पुष्पा 2'ॲक्शन आणि रोमान्सचा जबरदस्त धमाका आहे. चित्रपटातील रश्मिका आणि अल्लू अर्जुनची (Allu Arjun ) केमिस्ट्री चाहत्यांना खूप जास्त आवडली.

'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये रिलीज झाला असून सर्व भाषांमध्ये तो छप्परफाड कमाई करत आहे. चित्रपटाचा चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी पुष्पाने बंपर कमाई केली आहे.

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' ने पहिल्या दिवशी 164.25 कोटी, दुसऱ्या दिवशी 93.8 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 119.25 कोटींची कमाई केली आहे. तर चित्रपटाने पेड प्रिव्ह्यूजमध्ये 10.65 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने वीकेंडला कमाल केली आहे. 'पुष्पा 2'ने चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी 141.5 कोटींची बंपर कमाई केली आहे. तर हिंदी भाषेत 85 कोटींचा व्यवसाय केला असून चार दिवसांचे एकूण कलेक्शन 529.45 कोटी रुपये झाले आहे.

2021 साली 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. हे दोन्ही चित्रपट सुकुमार दिग्दर्शित आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या जोडीने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. 'पुष्पा 2'ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये करोडोची कमाई केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

KDMC Hospital : KDMC रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणा! इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली; धक्कादायक सत्य समोर

Virar Local Train: धावत्या लोकलसमोर थेट रुळांवर उभा राहिला तरुण, पुढे जे घडलं ते पाहून प्रवाशांनाही बसला मोठा धक्का

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात नक्की खा 'या' 6 गावरान भाज्या

SCROLL FOR NEXT