Pushpa 2 Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Collection: 'पुष्पा 2'च्या कलेक्शनमध्ये सोमवारी घसरण, कमाईचा आकडा किती?

Pushpa 2 Box Office Collection Day 19 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'ने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. मात्र आता कलेक्शनच्या आकड्यात घसरण पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा चित्रपट बॉक्स ऑफिस धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 5 डिसेंबरला रिलीज झाला. या चित्रपटाने खूपच कमी वेळात मोठा टप्पा पार केला आहे. अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर काही प्रमाणात कलेक्शनमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. मात्र आता 'पुष्पा 2' च्या (Pushpa 2) कलेक्शनमध्ये घसरण होताना पाहायला मिळत आहे. एका दिवसाच्या कमाईमध्ये घट झालेली पाहायला मिळत आहे.

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 19

'पुष्पा 2' चित्रपटाने जगभरात 1500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2'चित्रपटाने १९व्या दिवसापर्यंत बॉक्स ऑफिसवर 1074 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 725.8 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात 264.8 कोटींची कमाई केली.

'पुष्पा 2' चित्रपटाने 19व्या दिवशी 12.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अखेर तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी 'पुष्पा 2' चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाने तिसऱ्या रविवारी 33.25 कोटी रुपये कमावले आहेत. 'पुष्पा 2' चित्रपटाने 'बाहुबली 2' चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

'पुष्पा 2'च्या प्रचंड यशानंतर आता प्रेक्षकांना 'पुष्पा 3' चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन (Allu Arjun ) आणि रश्मिका मंदान्नासोबतच (Rashmika Mandanna ) फहद फॉसिलची भूमिका देखील चाहत्यांना खूप आवडली. 'पुष्पा 2' हा चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. यात तेलुगु, हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळ यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही? करा ‘हे’ 7 उपाय, माता लक्ष्मीच्या आशिर्वादाने होईल धनलाभ

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! 8व्या वेतन आयोगामुळे पगारवाढ लांबणीवर? कधीपर्यंत होणार वाचा सविस्तर...

Daily salt intake: दररोज किती मीठ खावं? WHOने सांगितलेल्या मर्यादेपेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतात, वाचा

Maharashtra News Live Update: Gen Z वर फोकस करा आणि त्यांच्याशी संपर्क ठेवा- राज ठाकरे

Political News : राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत, एकाचवेळी दिल्ली आणि राज्यात हालचाली

SCROLL FOR NEXT