Pushpa 2 Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Collection : 'पुष्पा 2'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा, तिसऱ्या शनिवारी किती कमावले?

Pushpa 2 Box Office Collection Day 17 : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे. या चित्रपटाचा तिसरा आठवडा देखील खूप खास ठरला. चित्रपटाच्या तिसऱ्या शनिवारचे कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2) हा चित्रपट 5 डिसेंबरला रिलीज झाला होता. या चित्रपटाने खूप कमी वेळात मोठी कमाई केली आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुन ( Allu Arjun ) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. 'पुष्पा 2' हा ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाने जगाला वेड लावले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी आताही थिएटरमध्ये गर्दी पाहायला मिळते.

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 17

मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2: द रुल' ने पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाचे एकूण कलेक्शन 264.8 कोटी रुपये होते. चित्रपटाची 16 दिवसांची एकूण कमाई 1002.71 कोटी रुपये झाली आहे. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाने 16व्या दिवशी 14.3 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाने 17 व्या दिवशी चित्रपटाने 25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 1500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाची 17 व्या दिवसाची कमाई 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडू शकली नाही.

'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. हा चित्रपट तमिळ, तेलगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये देखील बंपर कमाई केली होती. या चित्रपटाच्या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर 'पुष्पा 2'च्या कलेक्शनमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT