Pushpa 2 Collection  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Collection : पुष्पा भाऊची गाडी सुसाट; १४ दिवसात घसघशीत कमाई, एकूण कलेक्शन किती?

Pushpa 2 Box Office Collection Day 14 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाचा डंका जगभरात वाजत आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाचे १४व्या दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2) चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे. रिलीजच्या १४ दिवसात चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. 'पुष्पा' चित्रपट ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यात तमिळ, तेलगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम या भाषांचा समावेश आहे.

'पुष्पा 2' चित्रपट सुकुमार दिग्दर्शित आहे. या चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. 'पुष्पा 2' चित्रपटात जबरदस्त ॲक्शनचा धमाका पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' चित्रपटाने जगभरात 1409 कोटींचा टप्पा पार केला आहे.

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 14

मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' चित्रपटाने रिलीजच्या १४व्या दिवशी सर्व भाषांमध्ये मिळून 972.2 कोटींची कमाई झाली आहे. तर 'पुष्पा 2' ने हिंदी भाषेत 14व्या दिवशी 16.25 कोटी रुपये कमावले आहेत. आतापर्यंत हिंदी भाषेत एकूण कलेक्शन 607.35 कोटी रुपये झाले आहे. 'पुष्पा 2'ने 'स्त्री 2'च्या 14व्या दिवशीच्या कलेक्शनला मागे टाकले आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाने हिंदी भाषेत पहिल्या आठवड्यात 425.1 कोटी रुपये कमावले होते. हा चित्रपट सुरुवातीपासूनच बंपर कमाई करत आहे. 'पुष्पा 2' आता लवकरच 1000 कोटी क्लबमध्ये सामील होणार आहे.

अल्लू अर्जुनच्या अटकेनंतरही 'पुष्पा २'च्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. 'पुष्पा 2' आता लवकरच 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडणार आहे. 'पुष्पा 2' हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या पॅन इंडिया चित्रपटाच्या यादीत टॉप 3 मध्ये येतो. आताही चित्रपट पाहण्यासाठी थिएटरच्या बाहेर रांगा लागलेल्या पाहायला मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

Building Collapse : भिवंडी हादरली! ४ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

PM modi Video : पेपर लीकप्रकरणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ मेसेज, घोटाळेबाजांना कडक इशारा

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT