Pushpa 2 Declared Release Date Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Release Date: ‘पुष्पा २’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; अल्लू अर्जूनचा बिगबजेट चित्रपट शाहरूखच्या ‘डंकी’ला नडणार...

Pushpa 2 The Rule Release Date: चित्रपटाचा टीझर, फर्स्ट पोस्टर आणि लूक पाहिल्यानंतर सर्वांनाच चित्रपटाची रिलीज डेट जाणून घ्यायची होती. अखेर आज चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.

Chetan Bodke

Pushpa 2 Release Date Declared: अल्लू अर्जून मुख्य भूमिकेत असलेला ‘पुष्पा: द राईज’ २०२१ मध्ये जेव्हा रिलीज झाला त्यावेळी चित्रपटाने फक्त भारतातच नाही, तर अवघ्या जगभरात चित्रपटाने दमदार कमाई केली होती. गेल्या वर्षभरापासून चित्रपटाच्या सिक्वेलची चांगलीच चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक दिवसापासून चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची अर्थात ‘पुष्पा २’ सर्वच वाट पाहत आहेत. चित्रपटाचा टीझर, फर्स्ट पोस्टर आणि लूक पाहिल्यानंतर सर्वांनाच चित्रपटाची आतुरता होती. प्रत्येकाला या सिनेमाची रिलीज डेट जाणून घ्यायची होती. अखेर आज चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.

चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या अल्लू अर्जूनच्या वाढदिवशी चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला होता. तर नुकतंच चित्रपटाचा एक सीन लिक झाल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर होत होती. अखेर आज अधिकृतरित्या ‘पुष्पा २’ ची रिलीज डेट समोर आलेली नसली तरी, काही मीडिया रिपोर्टनुसार डिसेंबर महिन्यात हा चित्रपट रिलीज होऊ शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जूनचा हा बहुचर्चित आणि बिगबजेट चित्रपट येत्या २२ डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

अद्याप निर्मात्यांनी ‘पुष्पा २’ च्या प्रदर्शनाची तारीख जरी जाहीर केली नसली तरी, येत्या २२ डिसेंबरला अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ तर शाहरूखचा ‘डंकी’ एकमेकांना टक्कर देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही ही बिगबजेट आणि बहुचर्चित चित्रपट असल्याने कोण सर्वाधिक कमाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष असेल. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’मध्ये शाहरूखसोबत तापसी पन्नू एकत्र दिसणार आहे. मुख्य बाब म्हणजे, हा चित्रपट देखील डिसेंबरमध्येच प्रदर्शित होणार आहे.

सध्या मिळालेल्या माहितीनुसार, ‘पुष्पा २’मध्ये मुख्य भूमिकेत बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग देखील दिसणार आहे. तो या चित्रपटात पोलिसाची मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. अद्याप या बद्दल अधिकृत माहिती मिळालेली नसून चर्चाच सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana : दुर्दैवी! पोहण्याचा मोह जीवावर बेतला, पाय घसरून खोल नदीत २ मुलं बुडाली

लांब केसांसाठी दालचिनीचा घरगुती सोपा उपाय करा

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार?, भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: जादूटोणा प्रकरणाच्या तपासाला वेग; फिरोज शेख यांच्यावरील आरोप मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी फेटाळले

Sukanya Samriddhi Yojna: सुकन्या समृद्धी योजनेचा भन्नाट फॉर्म्युला! एवढीच गुंतवणूक करा आणि मिळवा ₹50 लाख

SCROLL FOR NEXT