Pushpa 2 Ticket Price SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Ticket Price : फक्त पुष्पा भाऊ... फर्स्ट डे शोच्या तिकिटाची किंमत वाचून धक्का बसेल

Pushpa 2 Ticket Price Mumbai : बहुप्रतीक्षित 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची पहिल्या दिवशी तिकीटाची किंमत किती जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र 'पुष्पा 2' ची (Pushpa 2) हवा पाहायला मिळत आहे. सर्वत्र चाहते 'पुष्पा 2' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा 2' हा या वर्षाचा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. आता हा चित्रपट 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'पुष्पा 2' चित्रपटात रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अल्लू अर्जुन (Allu Arjun) मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. अल्लू अर्जुनने चित्रपटात पुष्पाची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसत आहेत.

'पुष्पा 2'ॲडव्हान्स बुकिंग

'पुष्पा 2' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग 30 नोव्हेंबरपासून सुरू झाले होते. मीडिया रिपोर्टनुसार, आता पर्यंत 'पुष्पा 2'चित्रपटाने पाचही भाषांमध्ये पहिल्या दिवसासाठी सुमारे 22 कोटी रुपयांच्यावर प्री-सेल्स बुकिंग केली आहे. 'पुष्पा 2' या चित्रपटाने रिलीज होण्याआधीच तब्बल 1085 कोटींच्यावर एकूण कलेक्शन केल्याचं म्हटलं जात आहे.

'पुष्पा 2' चित्रपटाच्या तिकिटाची किंमत

'पुष्पा 2'च्या वाढत्या प्रतिसादामुळे चित्रपट पहिल्याच दिवशी बंपर कमाई करेल असे म्हटले जात आहे. 'पुष्पा 2'चित्रपटाचे पहिल्या काही काळात तिकिट खूप महाग असणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार,दिल्लीत 'पुष्पा 2'चित्रपटाचे सगळ्या महाग तिकीट विकलं जात आहे. तेथे एका तिकिटाची किंमत तब्बल 2400 रुपयांपर्यंत आहे. तर मुंबईत 'पुष्पा 2'चित्रपटाचे तिकीट 1600 - 1800 एवढे आहे. बंगळुरूमध्ये 1000 असा तिकीटाचा दर आहे.

'पुष्पा 2' सिनेमातील गाण्यांनी चाहत्यांना वेड लावले आहे. या चित्रपटाने रिलीज आधीच रेकॉर्डब्रेक यश मिळवले आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिकाने चित्रपटाचे प्रमोशनही जबरदस्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून साडेसात तास चौकशी

'धनंजय मुंडेंनी गाडी आडवी लावली, हवेत दोन गोळ्या झाडल्या'; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

महिला नेत्याच्या हत्येचा कट उधळला; ISI साठी काम करणारा तरुण दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात

Coconut Ladoo Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट नारळाचे लाडू; फक्त काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

Viral Video : ३ वर्षांचं मूल कडेवर घेऊन ट्रेनमध्ये चढत होती महिला; तोल जाऊन खाली पडली, दोन्ही पाय तुटले

SCROLL FOR NEXT