Sippy Gill Accident Video Instagram
मनोरंजन बातम्या

Sippy Gill Accident: 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती'; लोकप्रिय पंजाबी गायकाच्या कारचा भयानक अपघात, Video Viral

Sippy Gill Accident News: लोकप्रिय पंजाबी गायक आणि अभिनेता सिप्पी गिलच्या कारला अपघात झाल्याचे वृत्त मिळाले आहे.

Chetan Bodke

Sippy Gill Accident Video

पंजाबी संगीत क्षेत्रातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय पंजाबी गायक आणि अभिनेता सिप्पी गिलच्या (Singer Sippy Gill) कारला अपघात झाल्याचे वृत्त मिळाले आहे. सिप्पी गिलच्या कारला जेव्हा अपघात झाला तेव्हा तो कॅनडामध्ये होता. कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबियामध्ये त्याच्या कारचा उलटून अपघात झाला आहे. दरम्यान सिप्पीने कार अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Bollywood)

सिप्पीने अपघात झाल्यानंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. अपघाताबद्दल माहिती देताना सिप्पी स्वत: म्हणाला, "मी माझ्या मित्रांसोबत कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबियामध्ये निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी गेलो होतो. दरम्यान, माझ्या मित्रांनी बाहेर न येता रुममध्येच राहण्याचा निर्णय घेतला. मी एकटाच ऑफ- रोडिंगसाठी गेलो होतो. माझी जीप होती, त्यामध्ये प्रवास करत असतानाच माझी जीप उलटली. मला किरकोळ दुखापत झाली आहे. पण जीपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या रोडवरून जाणाऱ्या एका व्यक्तीने माझी मदत केली." (Singer)

"या रस्त्यावर अशा घटना सतत घडत असतात. या रोडवर अपघाताच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. चांगली गोष्ट म्हणजे तुला किरकोळ दुखापत झाली आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती, असं मला ज्या व्यक्तीने मदत केली त्याने सांगितलं." सिप्पीने त्याच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अपघाताचा व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये अपघाताची भीषणता पाहायला मिळत आहे. त्याची जीप खूपच वाईट पद्धतीने उलटली असून वरच्या बाजूने कारचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. पण असलं तरी, सिप्पी गिल या अपघातातून सुखरूप वाचला आहे. (Social Media)

दरम्यान, अभिनेत्यासोबत 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती', असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दरम्यान, सिप्पी गिल हा पंजाबी गायक असून तो त्याच्या गाण्यांमुळे फारच लोकप्रिय आहे. दरम्यान, सिप्पीचं ‘सोलमेट’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं. याशिवाय त्याचं ‘बेकदरा’ हे गाणंही हिट ठरलं होतं, या गाण्याला आतापर्यंत प्रचंड व्ह्यूज मिळाले आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

Skin Care : त्वचेवर दिवसातील कोणत्या वेळेस कोरफडीचे जेल लावावे? जाणून घ्या फायदे

Vidhan Bhavan Threat Mail: मुंबईत ४ ठिकाणी बॉम्बने उडवण्याची धमकी; पाहा ईमेलमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT