Singer Kanwar Chahal Passed Away Instagram @kanwarchahal
मनोरंजन बातम्या

Punjabi Singer Kanwar Chahal Died: पंजाबी संगीत क्षेत्रावर शोककळा; गायक कंवर चहलचे निधन

Kanwar Chahal: पंजाबी गायक कंवर चहलच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Pooja Dange

Kanwar Chahal Died At the Age Of 29: पंजाबी संगीत क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीत आपल्या आवाजाने लोकांच्या हृदयाला स्पर्श करण्याची ताकद असलेले गायक कंवर चहल यांचे निधन झाले आहे. कंवर चहल हा संगीत जगतातही एक उगवता तारा होता. कंवरने शेहनाज गिलसोबतही काम केले आहे.

पंजाबी गायक कंवर चहलच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. संपूर्ण संगीत जगतात शोककळा पसरली आहे. कंवर यांच्या पार्थिवावर पंजाबमधील मानसा येथील भिखीजवळ अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी त्याचे कुटुंबीय आणि मित्र त्यांना शेवटचा निरोप देतील. (Latest Entertainment News)

कंवर चहलने शेहनाज गिलसोबत 'माझे दी जट्टी'मध्ये काम केले आहे. कंवर चहलचे पहिले गाणे 'गल सुन जा' खूप गाजले. त्याच्या इतर हिट गाण्यांमध्ये 'डोर', 'इक वार', 'ब्रँड' या गाण्यांचा समावेश आहे. तसेच कंवर एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर देखील होता. तो नेहमी त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असायचा.

अलीकडच्या काळात पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीला अशा अनेक धक्क्यांचा सामना करावा लागला आहे. प्रसिद्ध गायक सिद्धू मूसवाला यांची हत्या झाली, तर गायक निर्वैर सिंग यांना अपघातात प्राण गमवावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Sleep Health: अचानक चिडचिड वाढतेय आणि स्क्रिन टाईमपण वाढलाय? ८ वर्षांच्या संशोधनात समोर आलं धक्कादायक कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! बर्थडे सेलिब्रेशनवेळी ५ मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून पेटवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Education Department Scam : शिक्षण विभागात खळबळ! तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT