AP Dhillon Live Performance Twitter
मनोरंजन बातम्या

AP Dhillon In WPL 2023: एपी ढिल्लों लाईव्ह परफॉर्न्समध्ये पडला ढिल्ला, चाहते-नेटकरी निराश

एपी ढिल्लोंवर अनेक गंभीर आरोप करण्यात येत आहेत.

Pooja Dange

AP Dhillon Live Performance In WPL 2023: प्रसिद्ध पंजाबी गायक एपी ढिल्लों नुकताच नवी मुंबईत आला होता. ब्राऊन मुंडे, इंसेन आणि एक्सक्यूज सारखी एपी ढिल्लोंने गायली आहेत. एपीची अनेक फॅन आहेत. त्याचे फॅन्स त्याची गाणी ऐकण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.

एपी ढिल्लों अमृतपाल सिंहा ढिल्लों या नावाने देखील ओळखला जातो. काल नवी मुंबईतील डी. वाय. पाटील या स्टेडियम एपीने परफॉर्म केले. वूमेन्स प्रीमियर लीग निमित्त एपीने सादरीकरण केले. यावेळी त्याने ब्राउन मुंडे, बहाणे, तेरे ते, पागल या गाण्यांनी मंचावर धुमाकूळ घातला. पण कदाचित काही लोकांना त्याचा परफॉर्मन्स आवडला नाही. त्यामुळे एपीवर अनेक गंभीर आरोप करण्यात येत आहेत.

मुंबईत वूमेन्स प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा काल पार पडला. यादरम्यान शोची होस्ट मंदिरा बेदीने एपी ढिल्लोंचे नाव घोषित करताच त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. वूमेन्स प्रीमियर लीग 2023 च्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करण्यासाठी एपी ढिल्लों थेट लॉस एंजेलिसहून आला होता. स्टेजवर येताच त्याने दमदार परफॉर्मन्स दिला. पण काही वेळाने लोकांच्या लक्षात आले की गायक लाइव्ह गात नसून लिपसिंक करत आहे.

जेव्हा प्रेक्षकांच्या हे लक्षात आले तेव्हापासून एसपी ढिल्लोंला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. यादरम्यान सोशल मीडियावर काही यूजर्सनी एपी ढिल्लोंला 'स्कॅम मॅन' देखील म्हटले आहे. एका युजरने लिहिले की, 'एपी ढिल्लों लॉस एंजेलिसहून वूमेन्स प्रीमियर लीगच्या उद्घाटन समारंभात लिप-सिक करण्यासाठी आला आहे'. काहींनी तर तो नीट लिप सिंक करत नसल्याचेही सांगितले. माईक धरायलाही तो विसरतोय, असे म्हटले आहे.

या सर्व प्रकरणामुळे एपी ढिल्लोंला नेटकरी ट्रोल करत आहेत. त्याच्या गाण्यापासून ते त्याच्या परफॉर्मन्सपर्यंत सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर रणवीर सिंहचे कौतुक करत आहेत. ओपनिंग सेरेमनीला हजेरी लावलेली अभिनेत्री क्रिती सेनॉन देखील लोक ट्रोल करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT