Urfi Javed Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: तोकड्या कपड्यांमधील उर्फीचा 'पुणे स्टाइल'नं निषेध; म्हणाले, तरूण मुलांच्या...

उर्फीच्या निषेधार्थ वाघोलीतील एका ग्रुपने संक्रातीचे निमित्त साधत अभिनेत्री उर्फी जावेदला वाण पाठवले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव

Urfi Javed: सध्या टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या तोकड्या कपड्यांमुळे कमालीची चर्चेत आली आहे. तिने सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याने हा सध्या वाद सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद संपण्याचं नाव घेत नाही. तिच्या या वागण्याने तरुण व लहान मुले यांच्या मनावर वाईट परिणाम होत आहे.याचा निषेध म्हणून वाघोलीतील एका ग्रुपने संक्रातीचे निमित्त साधत अभिनेत्री उर्फी जावेदला वाण म्हणून ऑनलाइन साडी भेट म्हणून पाठवली आहे.

सध्या उर्फी जावेद सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून तिच्या अनेक पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधुन घेत आहे. या पोस्टने अनेकदा ती अडचणीतही आली आहे. शनिवारी पोलीसांनी उर्फी जावेदची काही काळ चौकशी देखील केली आहे. पोलीस चौकशी पुर्ण झाली असली तरी तिचे ट्वीटर वॉर काही संपायचे नाव घेत नाही. उर्फीने आज देखील काही ट्वीट्स केले होते.

"सार्वजनिक ठिकाणी असे पोशाख परिधान केल्याने वातावरण खराब होत आहे. यामुळे लहान मुलांवर याचा वाईट परिणाम होतो. तिच्या अशा वागण्यामुळे सर्वांच्याच भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे आम्ही सर्वांनी मकरसंक्रांतीचे निमित्त साधत उर्फीला साडी भेट दिली. त्यामुळे ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आदर करत सार्वजनिक ठिकाणी व्यवस्थित पोशाख परिधान करेल." असे त्या ग्रुपने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT