Brahmastra  Saam Tv
मनोरंजन बातम्या

शाहरुख खान की रणवीर सिंग ? ; 'ब्रह्मास्त्र'च्या प्रोमो व्हिडिओत हा अभिनेता कोण?

निर्माता करण जोहरने एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरचा(Ranbir Kapoor) बहुप्रतीक्षित चित्रपट 'ब्रम्हास्त्र'(Brahmastra) हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. बिगबजेट आणि बहुचर्चित या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि मौनी रॉय यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज आहे. चित्रपटाच्या खलनायकापासून ते किंग खान अर्थात शाहरुख खानच्या कॅमियोपर्यंत तसेच चित्रपटातील कलाकारांनी साकारलेल्या त्यांच्या भूमिकेपर्यंत अजूनही अनेक गोष्टी गुलदस्त्यातच ठेवल्या आहेत. नुकतेच चित्रपटाचा निर्माता करण जोहरने एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

चित्रपट प्रदर्शनासाठी काही दिवसच राहिले आहेत, त्यात चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर हा प्रोमो व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटातील एका पात्राची झलक पाहायला मिळत आहे. निर्माता करण जोहरने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे चाहते चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत. हा प्रोमो व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओत नक्की शाहरुख खान आहे की, रणवीर सिंह? की चित्रपटात हे दोन्ही कलाकार दिसणार आहेत? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

शेअर केलेल्या प्रोमो व्हिडिओमध्ये, निर्मात्यांनी अभिनेत्याचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला आहे. हा चेहरा नक्की शाहरुख खानचा आहे की रणवीर सिंहचा हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. व्हिएफएक्स आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्साही झाले आहेत.

चाहत्यांनी प्रोमो व्हिडीओच्या खाली काही अनेक कमेंट करत आहेत. 'चित्रपटात अशोकाची भूमिका शाहरुख खानच करणार आहे ना?' असा प्रश्न एका युजरने उपस्थित केला. 'आशा आहे की, चित्रपटात शाहरुख खानच आहे.', 'कदाचित हा रणवीर सिंह आहे.', 'हा रणवीर सिंह सारखा दिसतोय' अशा अनेक कमेंट्स व्हिडिओच्या खाली नेटकरी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Maharashtra News Live Update: महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल - मंत्री संजय शिरसाट

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Marathi Serial: 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; खासदार अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण

Heart Damage Causes: जर तुम्हाला या 5 चुकीच्या सवयी असतील तर समजा तुमचं हृदय होतंय कमकुवत

SCROLL FOR NEXT