Priyanka Chopra  Instagram @priyankachopra
मनोरंजन बातम्या

Priyanka chopra: प्रियांका चोप्राने विकले मुंबईतील चार आलिशान फ्लॅट; १६ कोटींपेक्षा जास्त झाला नफा

Priyanka chopra sells Apartments: सात वर्षांपूर्वी भारत सोडून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या प्रियांका चोप्राने एकाच वेळी तिची चार घरे विकली आहेत. या करारात तिला १६ कोटींपेक्षा अधिकच नफा झाला आहे.

Shruti Vilas Kadam

Priyanka chopra sell Appartment: हिंदी चित्रपटसृष्टीतील 'देसी गर्ल' म्हणजेच प्रियांका चोप्रा हिची गणना इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या आणि श्रीमंत अभिनेत्रींमध्ये केली जाते. चित्रपटांव्यतिरिक्त, प्रियांका ब्रँड एंडोर्समेंट आणि गुंतवणुकीतूनही भरपूर कमाई करते. या अभिनेत्रीने आता अमेरिकेत बसून भारतात कोट्यवधी रुपयांचा करार केला आहे. प्रियांकाने मुंबईतील तिचे एक-दोन नव्हे तर चार अपार्टमेंट कोट्यवधी रुपयांना विकले आहेत.

हिंदुस्तान टाईम्समधील एका वृत्तानुसार, अभिनेत्रीने मुंबईतील तिचे चार अपार्टमेंट एका कुटुंबाला विकले आहेत. यामुळे अभिनेत्रीला १६ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. हा व्यवहार ३ मार्च २०२५ रोजी झाला. सचदेवा कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांनी ही मालमत्ता खरेदी केली आहे.

किती कोटींमध्ये करार झाला?

प्रियांका चोप्राने तिचे सर्व अपार्टमेंट १६.१७ कोटी रुपयांना विकले आहेत. हे चार फ्लॅट मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील ओबेरॉय स्काय गार्डन्समध्ये आहेत. यापैकी तीन फ्लॅट १८ व्या मजल्यावर आहेत तर एक फ्लॅट १९ व्या मजल्यावर आहे. फ्लॅट क्रमांक १८०१/ए हा श्रुती गौरव सचदेवाने ३ कोटी ४५ लाख ११ हजार ५०० रुपयांना खरेदी केला. या १,०७५ चौरस फूट फ्लॅटसाठी १७ लाख २६ हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली.

दुसरा फ्लॅट स्नेहा डांग सचदेवाने २ कोटी ८५ लाख रुपयांना फ्लॅट क्रमांक १८०१/सी खरेदी केला. या ८८५ चौरस फूट फ्लॅटसाठी १४ लाख २५ हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली. फ्लॅट क्रमांक १९०१/सी हा रौनक त्रिलोका सचदेवा यांना ३ कोटी ५२ लाख रुपयांना विकण्यात आला. या ११०० चौरस फूट फ्लॅटसाठी २१ लाख १२ हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली. तर फ्लॅटची एक जोडी (१८०१/बी आणि १९०१/बी) ६ कोटी ३५ लाख रुपयांना विकली गेली. हा फ्लॅट रजनी त्रिलोक सचदेवा यांनी खरेदी केले आणि ३१ लाख ७५ हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट गडद

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा २० वर्षानंतर निकाल लागला, पद्मसिंह पाटील निर्दोष, ओमराजेंना धक्का; कोर्टात नेमकं काय झालं?

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

SCROLL FOR NEXT