Priyanka Chopra Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra Video : प्रियंका चोप्राने गळ्यात गुंडाळला साप, पती निक जोनस पाहतच राहिला

Priyanka Chopra-Nick Jonas : प्रियंका चोप्राने नुकतेच सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहे. ज्यात तिने गळ्यात साप गुंडाळला आहे. यावर पती निक जोनसची प्रतिक्रिया पाहा.

Shreya Maskar

प्रियंका चोप्राने इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत.

फोटोंमध्ये प्रियंका चोप्राने गळ्यात साप गुंडाळला आहे.

प्रियंकाच्या गळ्यात साप पाहून निक जोनस पाहतच राहिला आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या तिच्या कुटुंबासोबत निवांत वेळ घालवताना दिसत आहे. ती ऑर्लँडो, फ्लोरिडा येथे गेली आहे. तिने नुकतेच इन्स्टाग्राम खास फोटो शेअर केले आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रियंका चोप्राने गळ्यात भला मोठा साप गुंडाळला आहे. जे पाहून पती निक जोनसला धक्का बसला आहे.

प्रियंका चोप्राने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात ती चक्क सापाशी खेळताना दिसत आहे. तिने गळ्यात भला मोठा साप गुंडाळून त्यांच्यासोबत फोटो काढले आहे. ती मनसोक्त हसताना दिसत आहे. मात्र हे सर्व पाहून निकला चांगलाच धक्का बसला आहे. त्याच्या फोटोंमधील रिएक्शन घाबरलेल्या आहेत. तो प्रियांकाला म्हणतो की, "मला तुझ्या गळ्यातील नवीन ज्वेलरी खूप आवडली." त्यावर प्रियांका हसून उत्तर देते की, "हा Serpenti आहे..."

प्रियंका मस्त, न घाबरता सापासोबत पोज देताना दिसत आहे. मात्र निक (Nick Jonas) अस्वस्थ दिसत आहे. निक सापापासून सावध अंतर ठेवत हसताना दिसतोय. प्रियंका चोप्राच्या या व्हिडीओवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिच्या धाडसाचे लोक कौतुक करत आहे. प्रियंका चोप्राला कायमच ॲडव्हेंचर गोष्टी करायला आवडतात. प्रियंकाने पोस्टमध्ये जुने फोटो देखील पोस्ट केले आहेत. ज्यात ती सापासोबत पोज करताना दिसत आहे.

वर्कफ्रंट

प्रियांका चोप्रा अलिकडेच 'हेड्स ऑफ स्टेट ' चित्रपटात पाहायला मिळाली. तसेच प्रियांका चोप्रा एसएस राजामौलीच्या SSMB29 चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियांका चोप्रा साऊथ अभिनेता महेश बाबूसोबत झळकणार आहे. SSMB29 चित्रपट ॲक्शन आणि ॲडव्हेंचरचा धमाका असणार आहे. चाहते देखील या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli : डोंबिवलीकरांचं आरोग्य धोक्यात; केमिकलमुळे चक्क रस्ताच झाला गुलाबी, VIDEO

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

Sunday Horoscope : लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Kolhapur IT Park: कोल्हापुरात होणार आयटीपार्क, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी

SCROLL FOR NEXT