मनोरंजन बातम्या

Priya Bapat Post: पहिल्यांदाच दिसला प्रिया बापटचा असा अवतार, सोशल मीडियावर रंगली तुफान चर्चा; पाहा फोटो

Pooja Dange

Priya Bapat Enjoying Her Vacation In Australia:

अभिनेत्री प्रिया बापट सध्या ऑस्ट्रेलियाला तिच्या व्हॅकेशनचा आनंद घेत आहे. ऑस्ट्रेलियात तिच्यासोबत उमेश कामत देखील आहे. दोघेही त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

ऑस्ट्रेलिया ट्रीपमध्ये प्रिया बापट नवनवीन गोष्टी ट्राय करत आहे. प्रिया बापटने नुकतेच तिचे बिकिनीमधील फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामुळे प्रिया बापट चर्चेत आला आहे.

प्रिया बापट पोस्ट

प्रिया बापटने ऑस्टेलियाच्या समुद्रकिनारी फोटो काढले आहेत. प्रियाने ग्रीन अँड व्हाईट बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. प्रिया या फोटोमध्ये खूपच आनंदी दिसत आहे आणि तिचे सुट्टीचा मनसोक्त आनंद घेत असल्याचे दिसत आहे.

तसेच तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'अजून एक नवीन गोष्ट केली. माझ्या यादीतील आणखी गोष्ट पूर्ण झाली.'(Here's to more 'first times' and owning every inch of me! One more thing off the 'I-did-it' list! 📝💖)

प्रियाच्या या पोस्टवरून अनेक नेटकरी ट्रोल करत आहेत.'प्रिया ताई तुझी एक वेगळीच ओळख आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये तुला असं करण्याची खरंच गरज नाही. मुक्ता बर्वे अशा मोठ्या कलाकारांमध्ये तुझे नाव आदरणारे घेतले जाते. पण तू आत्ता स्वतःला वेगळ्या यादीत टाकत आहेस आणि हे तुझ्यासाठी योग्य नाही... तू एक छान कलाकार आहेस.' 'बाहेर गावी जाऊन असेच फोटो काढल्या शिवाय पिकनिक पूर्ण होत नाही वाटत, पण आपल्या मराठी अभिनेत्रींकडून हे अपेक्षित नव्हतं.' अशा कमेंट नेटकरी करत आहेत.

काही नेटकऱ्यांनी प्रिया बापटची बाजू घेतली आहे आणि तिचे कौतुक केले आहे. नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की, 'प्रिया तू खूप सुंदर दिसत आहेस. तुला यासगळ्यांच्या घाणेरड्या कमेंटला उत्तर द्यायची गरज नाही.' 'या चीप कमेंटकडे लक्ष देऊ नको'

प्रिया बापटच्या या पोस्टमुळे नेटकरी पुन्हा मराठी परंपरा, मराठी मुली यावर भाष्य करत आहेत. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री मिताली मयेकरने देखील बिकिनीवरील फोटो पोस्ट केले होते. तेव्हा देखील नेटकऱ्यांनी संस्कृतीची समज दिली होती. त्यानंतर मिताली मयेकरने नेटकऱ्यांना चांगलंच सुनावलं देखील होत.

प्रिया बापट आणि उमेश कामात सध्या 'जर तरची गोष्ट' या नाटकामध्ये एकत्र काम करत आहेत. प्रिया आणि उमेशसह पल्लवी पाटील, आशुतोष गोखले, अमोघ फडके, अद्वैत आठवले हे कलाकार देखील ऑस्ट्रेलियाला गेले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT