Apurva Nemlekar  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Apurva Nemlekar: 'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्रीने चाहत्यांना दिली गुड न्यूज; सणासुदीचा मूहूर्त साधत घेतली नवीकोरी कार

Apurva Nemlekar New Car: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.अपूर्वाने रक्षाबंधनाच्या दिवशी नवी कोरी कार खरेदी केली आहे.

Manasvi Choudhary

मराठी मनोरंजनविश्वातील कलाकारांना २०२४ हे वर्ष लकी ठरले आहे. अनेक कलाकारांनी घर, गाडी घेत स्वप्न पूर्ण केले आहेत. अशातच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.अपूर्वाने रक्षाबंधनाच्या दिवशी नवी कोरी कार खरेदी केली आहे.

नुकतंच सोशल मीडियावर अपूर्वाने कारसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अपूर्वाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. अपूर्वाने परिवारासोबतचे फोटो पोस्ट करत, "रक्षाबंधन आणि तिसरा श्रावण सोमवार या शुभदिनी नवीन कार खरेदी केली असल्याचं सांगितलं आहे. या आनंदाच्या क्षणी मी माझ्या भावाला अन् वडिलांना मिस करतेय..." असं कॅप्शन अपूर्वाने दिलं आहे. अपूर्वाच्या फोटोंवर सेलिब्रिटींसह तिच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

अपूर्वा नेमळेकर 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून लोकप्रिय झाली. मालिकेत अपूर्वाने शेवंताची भूमिका साकारली. मालिकेतील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. बिग बॉस मराठीमध्ये अपूर्वाने सहभाग घेतला होता. सध्या अपूर्वा 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेमध्ये दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT