Pravin Tarde Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pravin Tarde: 'एका बॉलिवूड स्टारचं नाव घेताच सगळ्यांच्या लेखण्या सरसावल्या...'; प्रवीण तरडेंचा मराठी लेखक-दिग्दर्शकांवर संताप

Pravin Tarde: ‘देऊळ बंद २’च्या यशादरम्यान प्रवीण तरडेंनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत मराठी लेखक-दिग्दर्शकांवर टीका केली. शाहरुख खानच्या उल्लेखानंतर झालेल्या चर्चांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Shruti Vilas Kadam

Pravin Tarde: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे सध्या त्यांच्या ‘देऊळ बंद २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही तो दमदार कामगिरी करत आहे. २१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत ८० कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून लवकरच हा चित्रपट १०० कोटी पार करण्याची अपेक्षा आहे. मात्र, चित्रपटाच्या यशाबरोबरच आता प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे नवा वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रवीण तरडे हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. कोणताही विषय असो, ते आपली भूमिका ठामपणे मांडताना दिसतात. प्रवीण तरडे यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानेने त्यांच्या ‘देऊळ बंद २’ चित्रपटाला कशी मदत केली याबद्दल आपल्या मुलाखतींमधून सांगितलं होतं. यानंतर मोठी चर्चा रंगली. अनेक मराठी कलाकारांनी यावर टिका केली. पण आता प्रवीण तरडे यांनी एक व्हिडिओपोस्ट करत मराठी लेखक, दिग्दर्शक आणि समीक्षकांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ‘देऊळ बंद २’च्या प्रचारासाठी गेल्या २९ दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असूनही त्याची दखल कोणी घेतली नाही, पण एका बॉलिवूड स्टारचे कौतुक काय केले तर मराठी चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांपासून सगळेच बोलू लागले अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये प्रवीण तरडे म्हणाले की, “नमस्कार मंडळी मी प्रवीण विठ्ठल तरडे. २९ दिवस झाले मी देऊळ बंद २ या चित्रपटासाठी अख्खा महाराष्ट्र फिरतोय. उन्हातान्हात, पावसात, मध्यरात्री, पहाटे, दिवसा तुम्ही माझे सगळे व्हिडीओ पाहिले. विदर्भ, खांदेश, पश्चिम महाराष्ट्र, पुण-मुंबई सगळं झालं की.. दिवस रात्र फिरलो न? नागपूर, आमरावती, अकोला,जळगाव, चाळीसगाव, शिर्डी सगळं फिरलो. उन्हातान्हात. तेव्हा तुम्ही कोणीही कुठल्या पोस्ट नाही टाकल्या हो कुणी लिहिलं नाही? माझ्या या मराठी फिल्म इंडस्ट्रीतील दिग्जांनीसुद्धा, पण एका बॉलीवूड स्टारचं मी नाव काय घेतलं तर धडाधड तुमच्या लेखण्या चालू झाल्या. म्हणजे पब्लिसिटीसाठी मराठी माणसाने नेमकं करायचं काय? खेड्या पाड्यातून उन्हातान्हातून आपल्या प्रेक्षकांना भेटायचं की मस्त एसीमध्ये बसून एखाद्या बॉलीवूड स्टारचं नाव घ्यायचं की तुम्ही मोकळे. मराठी लेखक दिग्दर्शकांनी तुमच्या पोस्ट वाचल्या पण, लक्षात ठेवा तुम्ही कितीही थांबवायचा प्रयत्न करा देऊळ बंद २ १०० कोटींची कमाई करणारच. तुमच्या टीकांनी त्याला फरक पडत नाही.

पुढे बोलताना त्यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा उल्लेख करत म्हणाले, "चला मंडळी भेटू. देऊळ बंद चाललाय त्याच्या गतीने फक्त विंदा करंदीकरांची एक कविता सांगतो उंची न वाढते आपली फारसी वाटू न हेवा श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. मग तो पिट्या असू दे नाहीतरी शाहरुख खान असूदे ज्याने आपल्याला मदत केलीये जाहीरपणे त्याचं कौतुक आणि कबुली देता आली पाहिजे. धन्यावद मंडळी जय महाराष्ट्र अरे हाच आपला मराठी बाणा आहे.”

प्रवीण तरडे यांनी या व्हिडिओ खाली कॅप्शनमध्ये लिहिले, “अख्खा महाराष्ट्र फिरतोय पण कुणाला दिसलो नाही आज एका बॅालिवूड स्टारचं नाव काय घेतलं लोकांच्या लेखण्या सरसावल्या एकदम.. ॲालरेडी सिनेमाला थांबवण्याचा बराच प्रयत्न केला काहीजणांनी नाही थांबवता आला म्हणून आता आडवाटेने का लढताय ..? कुणीही सो कॅाल्ड दिग्गज पाठीशी नसताना सिनेमा ईथवर आलाय कारण प्रयत्न प्रामाणिक आहेत.. धन्यवाद मंडळी.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes: औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज 15 मिनिटं करा हे रुटीन फॉलो, लगेचच मिळेल आराम

Maharashtra News Live Update: घाटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला गेली पाच दिवसांपासून ठोकले ग्रामस्थांनी कूलूप

नॉट रिचेबल ओमराजे निंबाळकरांचं लोकशन सापडलं; महत्त्वाची माहिती समोर

Diabetes complications: या 6 अवयवांवर मधुमेहाचा होतो गंभीर परिणाम, डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा

PF Withdrawal Facility : PF खातेदारांसाठी मोठी खुशखबर! PF काढण्याची पद्धत बदलणार, महिनाअखेरीस सुरू होणार नवी सुविधा

SCROLL FOR NEXT