'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज झाला.
'देऊळ बंद २' प्रवीण तरडे दिग्दर्शित आहे.
'देऊळ बंद २' दुसऱ्या आठवड्यातही हाऊसफुल पाहायला मिळत आहे.
'देऊळ बंद' प्रमाणेच 'देऊळ बंद २' ला प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहे. सोशल मीडियावर 'देऊळ बंद २' बद्दल भन्नाट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. सर्वजण मराठीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या अभिनयाचे आणि उत्साहाचे कौतुक करत आहे. 'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज झाला. या भागात शेतकऱ्याची कथा दाखवण्यात आली आहे, जी थेट प्रेक्षकांच्या काळजाला भिडली. 'देऊळ बंद २' चित्रपटात महिला शेतकऱ्याच्या भूमिकेत स्नेहल तरडे दिसल्या आहेत. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. चित्रपटाचे कलेक्शन जाणून घेऊयात.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाने दुसऱ्या बुधवारी म्हणजे १४ व्या दिवशी १,९५० शोजमधून ₹१.८० कोटींची नेट कमाई केली आहे. यामुळे आतापर्यंतचे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन ₹५९.७३ कोटी रुपये झाले तर नेट कलेक्शन ५०.८० कोटी इतके झाले आहे.
'देऊळ बंद २' दिवस १ - ३.०५ कोटी रुपये
दिवस २ -३.११ कोटी रुपये
दिवस ३ -५.२१ कोटी रुपये
दिवस ४ - ६. १० कोटी रुपये
दिवस ५ - ३. ७० कोटी रुपये
दिवस ६ - ३.३५ कोटी रुपये
दिवस ७ - ३.६० कोटी रुपये
दिवस ८ - ४.५५ कोटी रुपये
दिवस ९ - ३.१० कोटी रुपये
दिवस १० - ५ कोटी रुपये
दिवस ११ - ५.७५ कोटी रुपये
दिवस १२ - २.६० कोटी रुपये
दिवस १३ - २.३५ कोटी रुपये
दिवस १४ - १.८० कोटी रुपये
एकूण - ५०.८० कोटी रुपये
'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखती प्रवीण तरडेंनी सांगितले की, "देऊळ बंद २ नंतर शक्यतो 'मुळशी पॅटर्न २'कडे मी जाईन...आपण जेव्हा घर बुक करतो तेव्हा त्याचा मोठा हप्ता भरावा लागतो. त्यामुळे तुमच्या-आमच्या घराचं स्वप्न महाग का झालं? याचं उत्तर 'मुळशी पॅटर्न २' मध्ये मिळणार...चित्रपटाचे नावच आहे- 'मुळशी पॅटर्न २ -तुमच्या घरातच्या भिंतीतल्या वाळूतील गोष्ट' " चाहते आता 'मुळशी पॅटर्न २' साठी खूपच उत्सुक पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.