Deool Band 2 Collection  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Deool Band 2 Collection : स्वामींची कृपा! 'देऊळ बंद २'ची १०० कोटींच्या दिशेने यशस्वी घोडदौड सुरू; 'राजा शिवाजी'ला देतोय तगडी टक्कर, प्रवीण तरडेंच्या चित्रपटाने किती कमावले?

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 13 : प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आता चित्रपट १०० कोटींच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.

Shreya Maskar

'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज झाला.

'देऊळ बंद २' ने ५० कोटींचा आकडा ओलांडला.

'देऊळ बंद २' चित्रपट 'राजा शिवाजी' ला तगडी टक्कर देत आहे.

प्रवीण तरडेंचा शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित आणि स्वामी भक्तीत दाखवणारा 'देऊळ बंद २' चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे. चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा ओलांडला असून आता १०० कोटींकडे वाटचाल पाहायला मिळत आहे. 'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला गुरुवारी रिलीज झाला आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींनी स्वामींची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री स्नेहल तरडेने शेतकरी महिलेची भूमिका साकारली. चित्रपटाने १३ व्या दिवशी किती कमावले, जाणून घेऊयात.

'देऊळ बंद 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 13

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 13 व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या मंगळवारी प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाने 1,925 शोजमधून ₹2.35 कोटींचा व्यवसाय केला आहे. यामुळे आतापर्यंतचे भारतातील एकूण ग्रॉस कमाई 57.63 कोटी आणि एकूण नेट कमाईने 49.00 कोटी रुपये इतकी झाली आहे. 'देऊळ बंद २' चित्रपट रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला तगडी टक्कर देत आहे.

  • दिवस १ - ३.०५ कोटी रुपये

  • दिवस २ -३.११ कोटी रुपये

  • दिवस ३ -५.२१ कोटी रुपये

  • दिवस ४ - ६. १० कोटी रुपये

  • दिवस ५ - ३. ७० कोटी रुपये

  • दिवस ६ - ३.३५ कोटी रुपये

  • दिवस ७ - ३.६० कोटी रुपये

  • दिवस ८ - ४.५५ कोटी रुपये

  • दिवस ९ - ३.१० कोटी रुपये

  • दिवस १० - ५ कोटी रुपये

  • दिवस ११ - ५.७५ कोटी रुपये

  • दिवस १२ - २.६० कोटी रुपये

  • दिवस १३ - २.३५ कोटी रुपये

  • एकूण - ४९.०० कोटी रुपये

प्रवीण तरडेंचे मराठी चित्रपट

  • देऊळ बंद - २०१५

  • मुळशी पॅटर्न - २०१८

  • सरसेनापती हंबीरराव - २०२२

  • धर्मवीर - २०२२

  • धर्मवीर २ - २०२४

  • देऊळ बंद २ - २०२६

'देऊळ बंद 3' येणार

'देऊळ बंद २' चित्रपटाच्या शेवटी गश्मीर महाजनी म्हणजेच राघव शास्त्रीची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळते. राघव शास्त्रीला अमेरिकेत स्वामींचा फोन येतो. स्वामी म्हणतात, "येस माय डार्लिंग, आय एम युअर गॉडच... काय म्हणतेय तुझी अमेरिका? काय म्हणतोय तुझा डोनाल्ड ट्रम्प?" 'देऊळ बंद ३-आत्मनिर्भर भारत' असे चित्रपटाचे नाव असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय! शेतकऱ्यांच्या 'या' योजनेला ३ वर्षांची मुदतवाढ;भूमिहीन शेतमजुरांचाही समावेश

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयात घुसले

Actress Death: सिनेसृष्टीला मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेत्रीचे ब्रेन स्ट्रोकमुळे निधन, कुटुंबाने ४ महिने लपवली बातमी

Milk: दूध प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का?

केसांचा रंग काळाच का असतो? कारण तुम्हाला माहितीये का?

SCROLL FOR NEXT