Dharmaveer 2 Movie Muhurta Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dharmaveer 2 Movie Muhurta: ‘धर्मवीर २’चा शानदार मुहूर्तसोहळा, आनंद दिघेंना वंदन करत शुटिंगला सुरुवात

Dharmaveer 2 Movie: प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २’च्या शुटिंगचा आज शानदार मुहूर्तसोहळा पार पडला. यावेळी धर्मवीर आनंद दिघेंना वंदन करत आजपासून ठाण्यामध्ये शुटिंगला सुरुवात झाली आहे.

Chetan Bodke

Dharamveer 2 Movie Muhurta

प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २’च्या शुटिंगला आजपासून ठाण्यामध्ये सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचा गेल्या वर्षी पहिला भाग प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर निर्मात्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर २’ची घोषणा केली. आता या चित्रपटाच्या शूटिंगला धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या ठाण्यातूनच सुरूवात झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नुकताच आज चित्रपटाचा ठाण्यामध्ये मुहूर्त पार पडला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माते मंगेश देसाई, धर्मवीर आनंद दिघे यांचे पात्र साकारणारा प्रसाद ओकसह चित्रपटाच्या आदी स्टारकास्टने हजेरी लावली होती. अभिनेता प्रसाद ओकने सोशल मीडियावर चित्रपटाच्या मुहूर्त दरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ‘‘धर्मवीर २’ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’ असं कॅप्शन दिले.

‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २४.६७ कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. चित्रपटाला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ९ ऑगस्टला चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेत ‘धर्मवीर २’ची घोषणा केली होती. चित्रपटाची कथेची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.

अभिनेता मंगेश देसाई यांच्या साहील मोशन पिक्चर्सनं आणि झी स्टुडिओजने ‘धर्मवीर’ (Dharmaveer) या चित्रपटाची निर्मिती केली होती. तर प्रवीण तरडे यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते.

चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रसाद ओक, श्रुती मराठे, गश्मीर महाजनी, क्षितिश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अभिजित खांडकेकर, मोहन जोशी, स्नेहल तरडे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

दरम्यान, प्रसाद ओकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘धर्मवीर २’ व्यतिरिक्त ‘पठ्ठे बापूराव’, ‘जिलबी’, ‘वडापाव’, ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटांमधून प्रसाद ओक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

बनावट CBI चा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड; सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर अन्...

Panner Chilli Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूडस्टाईल टेस्टी पनीर चिली, वाचा सोपी रेसिपी

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT